दिंडोरी : महिलांनी स्वत:ची ओळख स्वत: निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे, असे प्रतिपादन नाशिकच्या जिजाऊ महिला सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा तथा जिल्हा महिला बचत गट पतसंस्थेच्या संस्थापक अश्विनी बोरस्ते यांनी केले. महिलांमध्येही प्रचंड क्षमता असल्याने विविध क्षेत्रात त्या प्रगती करत आहेत. त्यामुळे विद्यार्थिंनींनी मनातील भीती दूर करावी, असे आवाहनही त्यांनी केले.दिंडोरी येथील क्र ांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय महिला आयोगाच्या सहकार्याने ‘‘आर्थिक विकासातून महिलांचे सक्षमीकरण’’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या. मविप्र दिंडोरी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.वेदश्री थिगळे सत्राच्या अध्यक्षस्थानी होत्या.या प्रसंगी मंचावर उद्योजिका मनीषा धात्रक, प्राचार्य डॉ. संजय सानप , उपप्राचार्य प्रा. डॉ. सुनिल उगले, समन्वयक प्रा.रु पाली सानप, ,डॉ.अनिल आहिरे, डॉ.धिरज झाल्टे उपस्थित होते. उद्योजक मनीषा धात्रक यांनी उद्योग व्यवसायातील महिलांना असलेल्या संधी या विषयावर मार्गदर्शन केले.अध्यक्षस्थानावरून मनोगत व्यक्त करतांना प्राचार्या डॉ.वेदश्री थिगळे म्हणाल्या समाजातील विविध घटकांनी महिलांच्या आर्थिक विकासासाठी योगदान दिले पाहिजे, महिलांचे आर्थिक स्वावलंबन त्यांच्या सन्मानाचा पाया आहे. मंगळवारी चर्चा सत्राचे उद्घाटन महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या प्रमुख आश्वती डोरजे यांच्या हस्ते झाले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष प्रभाकरराव धात्रक होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालय विकास सम तिचे अध्यक्ष तथा संस्थेचे संचालक यशवंतराव दरगोडे, संचालक शरद बोडके उपस्थित होते.प्राचार्य डॉ.संजय सानप यांनी मान्यवरांचे स्वागत करून महाविद्यालयाच्या उपक्र माची माहिती दिली. प्रा. रुपाली सानप यांनी प्रस्ताविकातून चर्चासत्राची भूमिका मांडली.सूत्रसंचालन प्रा.पूजा जाधव, प्रा.पूनम वाघ, प्रा.पंकजा आहिरे यांनी केले तर आभार डॉ.अनिल आहिरे यांनी मानले.
महिलांनी स्वत:ची ओळख निर्माण करावी : अश्विनी बोरस्ते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 1:12 AM