नाशिक : महिलांचे आरोग्य सुदृढ राहिले तर परिवाराचे व समाजाचे आरोग्यसुद्धा सुदृढ राहील. व्यक्तीचे मन हे जर कमकुवत असले तर अनेक आजारांना निमंत्रण मिळते. त्यामुळे महिलांनी आपल्या मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यायला हवे, असा संदेश प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या उपक्षेत्रीय संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंतीदीदी यांनी केले. महिला दिनानिमित्त आयोजित ‘नारीशक्ती सन्मान २०२१’ पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे रविवारी (दि. ७) महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ‘नारीशक्ती सन्मान २०२१’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना वासंतीदीदी म्हणाल्या, भारतीय संस्कृतीमध्ये देव व कुमारिका पूजनाचे संस्कार आहेत. भारतातील नद्यांची नावेसुद्धा महिलांवरूनच आहेत. ब्रह्माकुमारी विद्यालयातसुद्धा महिलांनाच पुढे करून विश्व परिवर्तनाचे कार्य प्रजापिता ब्रह्मा बाबा यांनी सुरू केल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
यावेळी शिक्षण समिती सभापती संगीता गायकवाड, प्राचार्य संगीता बाफना, सामाजिक समुपदेशक मीनाक्षी जगदाळे, मातोश्री कॉलेजच्या उपप्राचार्य वर्षा पाटील, उत्तर प्रदेश हरदोईच्या माजी खासदार लीना पाठक आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक पुष्पादीदी यांनी केले.
===Photopath===
080321\08nsk_11_08032021_13.jpg
===Caption===
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे ‘नारी शक्ती सन्मान २०२१’ पुरस्कारां वितरण करण्यात आले. याप्रसंही पुरस्कारार्थी महिलांसोबत उपक्षेत्रिय संचालक राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदी. समवेत. संगीता गायकवाड, संगीता बाफना, मीनाक्षी जगदाळे, वर्षा पाटील, लीला पाठक, पुष्पा दीदी आदी