कोरोनाचा एकीकडे हाहाकार सुरु होता तर दुसरीकडे हाहाकार रोखण्यासाठी दिवस-रात्र रस्त्यांवर उभे राहून कर्तव्य बजावताना शहर-ग्रामीण पोलीस दल दिसून आले. पुरुष अधिकारी, कर्मचाऱ्यांना तरी कर्तव्य बजावताना काही कौटुंबिक मर्यादा जाणवत नाहीत ; मात्र त्यांच्या तुलनेत महिला पोलिसांना कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून आपली नोकरीदेखील चोखपणे करण्याचे आव्हान पार पाडावे लागते, अशावेळी महिला पोलिसांपुढे मर्यादाही अधिक असतात. शहर पोलीस दलातील बहुतांश महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी वर्गाला कोरोनाच्या काळात ‘ड्यूटी’ बजावताना सर्वप्रथम आपल्या कुटुंबातील सदस्यांची समजूत काढत त्यांना धीर देऊन मगच घराचा उंबरा ओलांडावा लागत होता. यावेळी त्यांच्या चिमुकल्यांची समजूत काढणे त्यांच्यासाठी कठीण बनत होते.
---इन्फो--
आई-मुलांना मोबाईलचा आधार
रात्रपाळीत ड्यूटी करताना किंवा दिवसाही पोलीस ठाण्यात हजर असताना आई-मुलांना मोबाईलचा आधार महत्त्वाचा वाटत होता. कोरोनाच्या काळात कर्तव्य पार पाडताना पोलीस असलेल्या आईकडून आपल्या मुलांशी मोबाईलवरुन संवाद साधला जात होता. स्मार्टफोनमुळे व्हिडिओ कॉलमार्फत आई-मुलांची ऑन ड्यूटी भेट घटकाभर का होईना भेटीचा मार्ग मात्र खुला होता. यामुळे मुलांनाही मोठा दिलासा मिळत असे. रात्रीला आई जेव्हा पोलीस ठाण्याकडे घरातून निघत असे तेव्हा मात्र चिमुकल्यांचा चेहरा काहीसा पडलेला नक्कीच असायचा असेही काही महिला पोलिसांनी सांगितले.
---प्रतिक्रिया----
रात्रपाळीला ड्यूटी असल्यास मुलांची समजूत काढणे अवघड होत असे. मुलांना वाटायचे की आपली आई आपल्याजवळ असावी मात्र त्यांची समजूत काढत ड्यूटीसाठी रवाना होत असे. मुलगी नऊ वर्षाची असल्यामुळे ती समजूतदार असल्याने फारसे अवघड जात नव्हते; मात्र सकाळी आल्यावर ती म्हणत असे, ‘मम्मी तू रात्री नसल्यामुळे झोपच लागत नव्हती...’ तिच्या या वाक्याने काहीसे भावनिक होऊन जात असे.
- शीतल लोखंडे, महिला कॉन्स्टेबल, गंगापूर पोलीस ठाणे (फोटो आर वर ०२शीतल नावाने)
----
आई पोलीस असल्याने मला खूप चांगले वाटते. आई जेव्हा वर्दी घालून घराबाहेर पडते तेव्हा, तिला ‘बाय’ करताना मी मोबाईलमध्ये फोटो काढते. आई रात्रपाळीच्या ड्यूटीला जेव्हा जाते तेव्हा मला नेहमी उशिरा झोप लागते. आजोबा रात्री मला वेगवेगळ्या गोष्टी सांगतात तसेच शाळेचा अभ्यासही करुन घेतात.
- तन्वी उन्हवणे, मुलगी (फोटो आर वर ०२तन्वी)
----
कोरोनाकाळात रात्रपाळी करताना वायरलेस ड्यूटी सांभाळली. पोलीस नियंत्रण कक्षाकडून येणारे कॉल्स महत्त्वाचे असतात. यामुळे सातत्याने रात्री ९ वाजेपासून सकाळी ९ वाजेपर्यंत सतर्क राहत होतो. दोन्ही मुली शाळेत जातात. मोठी मुलगी दहावीला असल्याने ती खूप समजूतदार आहे. धाकटी मुलगी श्रेया सातवीला शिकते. दोन्ही बहिणींमध्ये खूपच प्रेम आहे, त्यामुळे त्या एकमेकींना सांभाळून घेतात.
-शिल्पा काळे, पोलीस नाईक (फोटो आर ०२ शिल्पा)
---
मम्मीला आम्ही लहानपणापासून ड्यूटी करताना बघत आलो, त्यामुळे सवय झाली आहे. आई ड्यूटीसाठी पोलीस ठाण्याकडे निघाली की कोरोनामुळे तिची खूपच चिंता वाटते. रात्रपाळीला आई जेव्हा जायची तेव्हा आठवडाभर मी आईला स्वयंपाकात मदत करुन लवकर स्वयंपाक पूर्ण करत आम्ही सगळे सोबत जेवण करायचो. त्यानंतर मम्मी ड्यूटीला रवाना होत असे. कधीकधी मम्मीची रात्री आठवण येत असे.
श्रेया काळे ( मुलगी) (फोटो आर वर ०२श्रेया)
===Photopath===
020621\02nsk_38_02062021_13.jpg~020621\02nsk_40_02062021_13.jpg
===Caption===
शीतल लोखंडे~तन्वी उन्हवणे