येवला : शहरात जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्र म संपन्न झाले. शहरातील राष्ट्र सेविका समितीच्या वतीने महिलांची बाइक रॅली काढण्यात आली. रॅलीची सुरवात टिळक मैदानातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व हवेत रंगीत फुगे सोडून, भारत माता कि जय या घोषणेने करण्यात आली. रॅलीत महिलांनी व मुलींनी पारंपरिक वेशभूषा केली होती. प्रत्येक महीलेच्या डोक्यावर बांधलेला फेटा या रॅलीचे प्रमुख आकर्षण ठरले. रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून व चौकातून निघाली, या दरम्यान राणा प्रताप आणि तात्या टोपे यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. रॅलीची सांगता तालुका क्र ीडा संकुल येथे करण्यात आली, यानंतर अल्पोहार झाल्यावर विविध वयोगटा मध्ये विविध खेळांचे आयोजन करण्यात आले . खेळातील विजयी महिलांना भांडगे पैठणी तर्फे देण्यात आलेल्या बक्षीसांचे वितरण कार्यक्र माच्या अध्यक्षा डॉ, संगीता पटेल, राष्ट्र सेवा समिती नाशिक जिल्हा कार्यवाहिक गीता कुलकर्णी व राष्ट्र सेवा समिती येवला कार्यवाह सरोज तिवारी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्र माचे सूत्र संचालन मंजुषा दाभाडे यांनी केले. डॉ चिन्मई कुलकर्णी यांनी महिलांना तुलना करण्याची सवय सोडण्याचा सल्ला दिला. डॉ संगीत पटेल यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. समितीतर्फे कतृत्वान महिलांची माहिती देणारे चित्र प्रदर्शन देखील या वेळी लावण्यात आले होते. माधवी देशपांडे, श्वेता पटेल, नेहा पटेल, मंजुश्री दाभाडे व सरोज तिवारी यांनी कार्यक्र माचे नियोजन केले. (वार्ताहर)
येवल्यात महिलांची बाइक रॅली
By admin | Published: March 09, 2017 1:20 AM