शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

महिला बालकल्याण समिती : समितीला दुय्यम लेखले जात असल्याची तक्रार सदस्यांचा सभागृहात ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 1:22 AM

नाशिक : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीची प्रशासनाकडून होणारी उपेक्षा, विलंब आणि दुय्यम लेखले जात असल्याची कैफियत मांडत सदस्यांनी सभागृहातच ठिय्या मांडला.

ठळक मुद्देप्रमुख अधिकारी उपस्थित नव्हताप्रशासनाचा निषेध

नाशिक : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीची प्रशासनाकडून सातत्याने होणारी उपेक्षा, कामांना लागणारा विलंब आणि नेहमीच दुय्यम लेखले जात असल्याची कैफियत मांडत समितीच्या सदस्यांनी सभागृहातच ठिय्या मांडत संताप व्यक्त केला. अधिकाºयांकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याबद्दलही प्रशासनाचा निषेध करण्यात आला आणि सामूहिक राजीनाम्याचा इशारा देण्यात आला. महिला व बालकल्याण समितीची मासिक सभा सभापती सरोज अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. मात्र, सभेला कामगार कल्याण अधिकारी ए. पी. वाघ, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र भंडारी वगळता एकही खात्याचा प्रमुख अधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे संतप्त झालेल्या सदस्यांनी सभागृहात सभापतींच्या समोर जागेत ठिय्या मांडला आणि संताप व्यक्त करत प्रशासनाचा निषेध केला. यामध्ये उपसभापती कावेरी घुगे यांच्यासह सत्यभामा गाडेकर, शीतल माळोदे, नयना गांगुर्डे, समिना मेमन, भाग्यश्री ढोमसे, प्रियंका घाटे, पूनम मोगरे यांचा समावेश होता. सभापती सरोज अहिरे यांनीही प्रशासनाच्या नाकर्त्या भूमिकेबाबत हतबलता व्यक्त करत राजीनामा देण्याचा इशारा दिला. महिला बालकल्याण समितीच्या सभांमध्ये नुसते ठराव केले जातात प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याची तक्रार यावेळी सदस्यांनी केली. समितीने महिला समुपदेशन केंद्र सहाही विभागांत स्थापन करण्याबाबतचा ठराव जून २०१७ मध्ये केला होता. परंतु, त्याची अद्याप कार्यवाही झालेली नाही. समितीचा निधी परस्पर अन्य खात्यांकडे वळविला जातो. कामेच होत नसतील तर समितीच बरखास्त करून टाकण्याची मागणी सदस्यांनी केली. सत्यभामा गाडेकर यांनी आम्हाला कठपुतळ्या करू नका आणि रुद्रावतार दाखविण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशारा दिला. अंगणवाड्यांतील महिला सेविकांच्या आरोग्य तपासणीचा कार्यक्रमही सभापतींना न विचारताच परस्पर घेण्यात आल्याबद्दल सभापतींनी आश्चर्य व्यक्त केले तसेच २६ जानेवारीला बिस्किटांऐवजी मुलांना दफ्तर वाटप करण्याचे ठरले असतानाही त्याची अंमलबजावणी झाली नसल्याने सरोज अहिरे यांनी नाराजी व्यक्त केली.उपआयुक्तांचे तासाभराने आगमनसमितीच्या सभेला उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर उपस्थित नव्हते. त्यामुळे सदस्यांनी अगोदर उपआयुक्तांना बोलवा, असा आग्रह धरला. परंतु, पाऊणतास उलटूनही उपआयुक्तांचे आगमन न झाल्याने सदस्यांनी आयुक्तांना बोलविण्याची मागणी केली. त्यानुसार, सभापतींनी आयुक्तांना दूरध्वनीवरून कल्पना दिली असता, आयुक्तांनी उपआयुक्तांना पाठवत असल्याचे सांगितले. त्यानुसार, तासाभराने उपआयुक्त दोरकुळकर यांचे सभागृहात आगमन झाले. त्यानंतर सदस्यांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला.