शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
3
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
4
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
5
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
6
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
7
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
8
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
9
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
10
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
11
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
12
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
13
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
14
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
15
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
16
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
17
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
18
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
19
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
20
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?

महिला बालकल्याण निवडणूक २१ रोजी

By admin | Published: October 09, 2014 12:58 AM

महिला बालकल्याण निवडणूक २१ रोजी

 

नाशिक : नाशिक महापालिकेच्या बदललेल्या राजकीय समीकरणात अडकलेल्या महिला बालकल्याण समितीच्या निवडणुकांना २१ तारखेचा मुहूर्त लागला असून, यंदा सभापतींबरोबर उपसभापतिपदाचीही निवडणूक होणार आहे. महिला आणि बालकल्याण या विषयांसाठी मानाच्या समजल्या जाणाऱ्या या निवडीकडे सर्वच पक्षांचे लक्ष असते. त्यामुळे या समितीवर आपल्याच पक्षाचा सभापती असावा अशी प्रत्येक पक्षाची इच्छा असते; परंतु यंदा महापौरपदाच्या निवडणुकीत बदललेली समीकरणे पाहता मनसेची सदस्यसंख्या सर्वाधिक असतानाही पक्षाकडे या समितीचे सभापतिपद येते की नाही या शक्यतेने गेल्या दोन महिन्यांपासून या निवडणुकीला मुहूर्त लागत नव्हता. दोन महिन्यांपूर्वीच या विभागासाठी सदस्यांची निवड झाली होती. त्यानंतर आलेल्या आचारसंहितेत आणि बदललेल्या राजकीय समीकरणात ही निवडणूक अडकून पडली होती. महापौरपदाच्या निवडीनंतर मनसेला राष्ट्रवादी ाअणि कॉँग्रेसने साथ दिल्याचे चित्र असुन तेच समिकरण कायम राहिले तर महिला आणि बालकल्याण समितीवरही मनसे आघाडीचाच झेंडा फडकू ाकतो. नऊ सदस्य असलेल्या या विभागात पूर्वी फक्त सभापतिपदाचीच निवड होत होती. यंदा त्यात सुधारणा करण्यात येऊन उपसभापतिपदाचीही निवड करण्यात येणार आहे. दोन महत्त्वाची पदे असल्याने या निवडणुकीतही राजकीय समीकरणे बदलण्याची दाट शक्यता आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली होत असलेल्या निवडणुकीचा बाकीचा कार्यक्रम दोन दिवसांत जाहीर करण्यात येईल. त्यानुसार अर्ज वाटप आणि माघारीची प्रक्रिया होईल. (प्रतिनिधी)