नाशिक : जागतिक महिला दिनानिमित्त शहरातील अनेक संस्था-संघटनांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शाळा- महाविद्यालयांत यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. तसेच विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला.कल्याणी महिला संस्था कल्याणी महिला सहकारी पतसंस्था, अनुसया विद्या प्रसारक मंडळ व मानस डेंटल केअर सेंटरच्या वतीने महिलांसाठी दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन पतसंस्थेच्या अध्यक्ष अंजली पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. चंद्रशेखर नामपूरकर यांनी दंत आरोग्याची माहिती सांगून रुग्णांची तपासणी केली. यावेळी ज्योती सोनवणे, मधुरा बक्षी, प्रतिभा महाले, मीरा बोडके, डॉ. मुग्धा सापटणेकर, डॉ. प्रियंका पुरी, डॉ. रोहित मोरे, डॉ. श्रद्धा बागुल आदी उपस्थित होते.दृष्टी भेट योजना जागतिक महिला दिनानिमित्ताने सुजय नेत्र सेवा व रायझिंग सन फाउंडेशनच्या सहकार्याने फक्त महिलांसाठी आयोजित केलेल्या दृष्टी भेट योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उपस्थित महिला रुग्णांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या योजनेअंतर्गत उपस्थित सर्व महिला रुग्णांची संगणकाच्या साहाय्याने मोफत नेत्र तपासणी करून मोफत औषधोपचार करण्यात आल्याची माहिती सुजय नेत्र सेवाचे संचालक डॉ. नानासाहेब खरे व डॉ. सुनीता खरे यांनी दिली. याप्रसंगी संजय खरे, सुशील पगारे, संदीप पगारे, प्रशांत खंडागळे, हर्षल विसपुते, गौतमी गायकवाड, दर्शना बर्वे, पूजा आहेर, गंगा गारगुंड, सुजाता सारसर, पूनम लोहकरे आदी उपस्थित होते. जागतिक महिला दिनानिमित्त खुशी अग्रवाल फाउंडेशनच्या वीझ किड्स इंग्लिश मीडिअम स्कूल शाळेत महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक दमयंती अग्रवाल, संचालक ललित अग्रवाल यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी शिक्षक व महिला पालक उपस्थित होते. महिला दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणीत कैलास मित्रमंडळाच्या वतीने पंचवटी येथील भावबंधन मंगल कार्यालय येथे महिला मेळावा घेण्यात आला. यावेळी आयोजक माजी महापौर अशोक मुर्तडक, प्रमुख पाहुणे म्हणून विनीता धारकर, आशा अशोक मुर्तडक, अदिती राहुल ढिकले, ऐश्वर्या अनिल मटाले, माजी नगरसेवक अर्चना जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शीतल बोरसे, सपना बुटे, रेखा गडाख, मीना आहेर, कविता जाधव, मनीषा धात्रक, जयश्री नाठे, माधुरी गायकवाड, कविता नेरकर व परिसरातील अनेक महिला उपस्थित होत्या. पंचवटी येथील उन्नती विद्यालयात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब सोनजे होते. यावेळी डॉ. मानसी नांदूरकर, सहायक परिवहन अधिकारी पल्लवी कोठावदे, उद्योजिका स्मिता शेळके, प्राजक्ता शिरोडे, अलका सोनजे या कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य कल्पना शिरोडे, अॅड. प्रवीण अमृतकर उपस्थित होते. प्रास्ताविक रवींद्र राणे यांनी केले. महिला दिनानिमित्त मातृ नर्सिंग होमच्या वतीने महिलांसाठी गर्भाशय मुखाची कॅन्सर तपासणी करण्यात आली. यावेळी डॉ. प्रेमराज खैरनार, विद्या खैरनार, डॉ. भगवान फराळे, डॉ. सुरेखा हिवाळे, डॉ. सचिन अरसुळे उपस्थित होते. शिबिरासाठी जगदीश बोरसे, जयश्री तोलांबे, दीपक पवार, शैलेंद्र साळी आदींनी सहकार्य केले.
महिला दिन : संस्था-संघटनांतर्फे विविध कार्यक्रम नारी शक्तीचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 1:10 AM
नाशिक : जागतिक महिला दिनानिमित्त शहरातील अनेक संस्था-संघटनांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शाळा- महाविद्यालयांत यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले.
ठळक मुद्देविविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव महिलांसाठी दंत तपासणी शिबिराचे आयोजन