सर्वतिर्थ टाकेद : महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा योजने अंतर्गत कांदा पिकाची महिलांची शेतीशाळा वर्ग चार नुकतीच इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील ग्रामपंचायत टाकेद येथील घोडेवाडीत शेतकरी जगण घोडे यांच्या शेतावर संपन्न झाली. या महिलांच्या शेती शाळेला घोडेवाडीसह परिसरातील बहुसंख्य महिला बचत गटातील महिला उपस्थित होत्या.दरम्यान इगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागातील ही पहिलीच शेतीशाळा उत्साहात संपन्न झाली. तालुक्यात दहा शेती शाळा घेण्यात येणार आहे. त्यापैकी टाकेद परिसरातील पहिलीच वैशिष्ट्यपूर्ण महत्वपूर्ण महिलांची शेतीशाळा घोडेवाडी येथे घेण्यात आली आहे.टाकेद विभागाच्या कृषी सहाय्यक जे. बी. गांगुर्डे यांच्या प्रयत्नाने ही आदीवासी शेतकरी महिलांची शेतीशाळा आयोजित करण्यात आली होती. या शेतीशाळेत इगतपुरी कृषी विभागाचे कृषी सहाय्यक के. एस. सोनवणे, अशोक राऊत, गांगुर्डे यांनी पाच महिला शेतकरी बचत गटातील २५ महिलांना कांदा शेती संदर्भात या शेतीशाळेत मार्गदर्शन केले.यामध्ये दशपर्णी अर्क बनविण्याचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन करण्यात आले. या शेतीशाळेत कृषी सहाय्यक सोनवणे यांनी कांदा खत व्यवस्थापनावर महिलांना मार्गदर्शन केले. कृषी सहाय्यक राऊत यांनी कीड व रोग व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले. शेती शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे आदिवासी महिला स्वयंस्फूर्तीने परिसरातील उपलब्ध साधन सामुग्रीतून निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, लमीत बनविणे, बीजप्रक्रिया करणे याबाबत हिरहिरीने भाग घेऊन त्याचा उपयोग आपल्या शेतात करतांना दिसत आहे. महाराष्ट्र शासन कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत आयोजित महिलांची शेतीशाळा यामध्ये कांदा पिकावर पाच महिला बचत गटातील महिलांना या शेतीशाळेत कांदा पीक लागवडीपासून ते काढणी पर्यंत व कांदा पिकाचे व्यवस्थापण करणे संदर्भात कांदा पिकाच्या अवस्थेनुसार आठ वर्ग घेण्यात येणार आहे. त्यापैकी या शाळेत चार वर्ग घेण्यात आले.यामध्ये पिकातील एकात्मिक कीड व रोगावार नियंत्रण आणण्यासाठी दशपर्णी अर्क, जीवामृत, औषधी बनवणे, कांडा तसेच सेंद्रिय पद्धतीने घेण्यात येणाऱ्या पिकांवर मार्गदर्शन प्रात्यक्षिक घेण्यात आले.या शेती शाळेत महिलांचे सांघिक खेळ घेण्यात आले. तसेच सर्व महिला शेतकऱ्यांना शेती उपयोगी औषधें, खते वाटप करण्यात आली. इगतपुरी बी एल टी एम आत्मा नाशिक यांनी मार्गदर्शन केले. या महिलांच्या शेतीशाळा कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रा. विलास खापरे, सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे होते यांनीही या प्रशिक्षणात मार्गदर्शन केले. तालुका कृषीअधिकारी तंवर, मंडळ अधिकारी भास्कर गीते, पर्यवेक्षक किशोर भरते, पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.