खेडगाव : येथील महिला ग्रामसभेत ग्रामपंचायतींतर्गत केलेल्या कामांचा आढावा व करावयाच्या कामांबाबत चर्चा करण्यात आली. ग्रामपंचायतीकडे असलेल्या विविध योजना, महिलांसाठी अत्यावश्यक असलेली कामे, आमचा गाव-आमचा विकास आराखडा वाचन व ग्रामबाल समितीची स्थापना, जैविक विविधता समिती, ग्रामनिधी व चौदाव्या वित्त आयोगांतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला.यावेळी महिलांसाठी गावांतर्गत सॅनिटरी नॅपकिन, डिस्पोझल मशीन व त्याबाबत जागृती, महिलांसाठी अत्यावश्यक सुविधांबाबत ग्रामपंचायत सदस्य अनिल ठुबे व सरपंच उगले यांनी मार्गदर्शन केले. अत्यावश्यक बाबींवर आढावा घेण्यात आला. यावेळी महिलांची जबाबदारी व कर्तृत्वावर सी. एस. विद्यालयाच्या मुख्याध्यापक श्रीमती गांगुर्डे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत वैयक्तिक स्वच्छता व आरोग्य काळजी याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शपथ देण्यात आली.
खेडगाव येथे महिला ग्रामसभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 10:37 PM