येवला : तालुक्यातील पूर्व भागात पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती सुरु झाली असून महिला पाण्यासाठी त्रस्त झाल्याचे चित्र दिसत आहे.येवला तालुक्यातील सायगाव महादेववाडी येथील आदिवासी महिलांनी पिण्याचे पाणीसाठी तहसील कार्यालवर हंडा मोर्चा काढला. तालुक्यातील सायगाव महादेववाडी येथे गेल्या दोन महिन्यांपासून पिण्याचे पाण्याच्या टँकरची मागणी करून सुद्धा पाण्याचे टँकर चालू होत नसल्याने संतप्त आदिवासी महिलांनी तहसील कार्यालवर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. सायगाव गावातील महादेववाडीत पिण्याच्या पाण्याची भयानक परिस्थिती निर्माण झाली असून या आदिवासी महिलांना पाणीसाठी वणवण भटकण्याची वेळ आली असून या महादेववाडीत एकच हातपंप असून त्यालाही कमी पाणी आहे. त्यामुळे गेल्या दोन मिहन्यापासून पाण्याच्या टँकरची मागणी करून सुद्धा प्रशासनामार्फत एकही टँकर सुरु न झाल्याने संतप्त महिलांनी तहसील कार्यालयावर हंडा मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले.तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांनी येत्या दोन दिवसात टँकरची व्यवस्था करतो असे आश्वासन दिल्या नंतर महिलांनी आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले.याप्रसंगी सुनील देशमुख,दिनेश खैरणार,भाऊसाहेब बोडखे,सोमनाथ सोनवणे,ताई कांबळे,तुळसाबाई मोरे,इंदुबाई सोनवणे,वारु बाई आव्हाड,शालिनी खैरणार,साखरबाई माळी,संगीता सोनवणे,सुमन आव्हाड,परीघा पवार,जनाबाई माळी,आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचा हंडा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 3:59 PM