लासलगाव - महिलांचे कौटुंबिक वादाचे निराकरण करून सुखी संसाराकरीता निफाड तालुका विधी व सेवा समितीचे वतीने मोफत सल्ला, मार्गदर्शन व सहाय्य उपलब्ध असून नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतला पाहिजे, असे आवाहन निफाड न्यायालयाच्या वरिष्ठ स्तर न्यायाधीश श्रीमती एम.एस.कोचर यांनी शनिवारी (दि.२१) निफाड न्यायालयात बोलतांना केले.निफाड तालुका विधी व सेवा समिती तसेच निफाड वकील संघाचे वतीने यायाधीश श्रीमती एम. एस.कोचर यांच्या प्रमुख उपस्थितीत व निफाड न्यायालयाच्या सह दिवाणी कनिष्ठ स्तर न्यायाधीश श्रीमती.पी.एन.गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘महिलांबाबत कायद्यांची जनजागृती’ या विषयी कार्यक्र म आयोजित करण्यात आला होता. महिलांनी त्यांच्या न्यायहक्काकरीता असलेल्या विविध कायद्याची माहिती अवगत करून अन्याय होत असेल तर मुकाबला या कायदेशीर न्यायाचा व अधिकाराचा वापर केला पाहिजे, असे प्रतिपादन निफाड न्यायालयाच्या सह दिवाणी कनिष्ठ स्तर न्यायाधीश श्रीमती.पी.एन.गोसावी यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक निफाड वकील संघाच्या सदस्य अॅड.योगीता जाधव यांनी केले. यावेळी अॅड. आदिबा शेख, अॅड.सुवर्णा चव्हाण, अॅड.रेखा सुरासे, अॅड. अभिलाषा दायमा तसेच महिला कर्मचारी श्रीमती.ए.एस.ताठे, श्रीमती एच.एस.तेजाळे व श्रीमती एम.व्ही मुरकुटे यांनी आपल्या भाषणात महिलांच्या न्याय हक्काची माहिती उपस्थित महिला पक्षकारांना दिली. अॅड.अफरोज शेख यांनी आभार मानले.
निफाड न्यायालयात महिला कायदेविषयक जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 5:24 PM
व्याख्यानांचे आयोजन : मोफत सल्ला घेण्याचे आवाहन
ठळक मुद्दे‘महिलांबाबत कायद्यांची जनजागृती’ या विषयी कार्यक्र म आयोजित करण्यात आला होता.