नाशिक : नाशिकच्या साहित्य संमेलनपदी डॉ. जयंत नारळीकर यांची झालेली निवड अत्यंत सार्थ आणि गौरवास्पद आहे. महिला साहित्यिकाला यंदा मान मिळाला नसला तरी तो पुढच्या वर्षी किंवा त्यानंतर कधीतरी मिळेल, अशी आशा मला असल्याचे प्रख्यात अभिनेत्री आणि साहित्याचा मोठा वारसा असलेली लेखिका मृणाल कुलकर्णी यांनी केले आहे.
प्रख्यात साहित्यिक गो. नी. दांडेकर यांची नात तसेच लेखिका, दिग्दर्शिका, अभिनेत्री आणि निर्माती असलेल्या मृणाल कुलकर्णी गुरुवारी एका कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी साहित्य संमेलन नाशिकला होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. त्यावेळी बाेलताना कुलकर्णी यांनी विज्ञानातील इतका मोठा संशोधक आणि मराठी साहित्याला विज्ञान साहित्याची खरी ओळख देणारा साहित्यिक अध्यक्षपदी लाभणे हे खरोखरच नाशिकचे भाग्य असल्याचे सांगितले. काही ज्येष्ठ साहित्यिक आणि महिला साहित्यिक अध्यक्ष पद स्वीकारण्यास राजी होत नसल्यामागे त्यातील निवडीचे राजकारण हा भाग असण्याची शक्यता असल्याचेही मृणाल कुलकर्णी यांनी सांगितले. यंदादेखील काही महिला साहित्यिकांची नावे अध्यक्षपदाच्या चर्चेत असूनही त्यांना अध्यक्षपद मिळाले नसले तरी ते पुढच्या वर्षी किंवा त्यापुढे कधीतरी मिळू शकेल, असेही कुलकर्णी यांनी नमूद केले.
फोटो
०४ मृणाल कुलकर्णी