लासलगाव : पिंपळगाव नजीक गावात गेल्या १५ ते २० दिवसांपासून पाणी न आल्याने संतप्त झालेल्या महिलांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा नेत पदाधिकाऱ्यांसह प्रशासनाला जाब विचारला.त्यामुळे पिंपळगाव नजीक येथे पंधरा ते वीस दिवसांपासून पाणी पुरवठा न झाल्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी थेट ग्रामपंचायतीवर येऊन हल्लाबोल केला. लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा यावेळी संतप्त महिलांनी दिला.लासलगावसह १६ गाव पाणीपुरवठा योजनेचा वारंवार विद्युत पुरवठा बंद-चालू होत असल्याने पाण्याची मोटर खराब होते तर कधी पाईपलाईन वारंवार फुटण्याचे प्रकार घडत असल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. यामुळे महिलावर्गाला मोठा त्रास सहन करावा लागतो.
पाण्यासाठी महिलांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 12:36 AM