वरखेडा : पारंपारिक शेती पद्धतीतून मार्ग काढीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत महिला देखील शेतात वेगवेगळे प्रयोग राबवून प्रयोगशील शेती व्यवसायाकडे वळत असल्याचे चित्र दिंडोरी तालूक्यातील ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे.पूर्वापार होत असलेल्या शेतीत महिलांचे योगदान मोठे आहे. शेतीत महिला वर्षानुवर्ष राबत आहे. आताच्या काळात शेतीचे स्वरूप बदलले. यंत्राचा वापर वाढला तरीही महिलांचा वाटा तसूभरही कमी झालेला नाही. आधुनिक शेती अन स्पर्धेच्या युगात तो आणखी वाढला आहे.दिंडोरी तालुक्यातील द्राक्षपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामीण भागात द्राक्ष उत्पादनाचा भार हजारो महिलांच्या हातात आहे.खेडगाव येथील महिला शेतकरी पुनम निवृत्ती डोखळे यांची ५ एकर द्राक्ष शेती आहे. पती निवृत्ती डोखळे त्यांचे सेंद्रिय तसेच विद्राव्य खत विक्री व्यवसाय असल्याने पुनम डोखळे यांना द्राक्ष शेतीचा भार संपूर्णपणे सांभाळावा लागत आहे. पुनम डोखळे या उच्चशिक्षित असल्याने दहा वर्षापासून द्राक्ष शेतीचे उत्तम नियोजन करून दर्जेदार व निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन घेत आहे.मुले लहान असल्याने स्वतः घरातील कामे उरकून शेतातील कामांचे नियोजन आखत असतात. शेतीचे मार्गदर्शन दिंडोरी तालुका कृषी अधिकारी अभिजीत जमदाडे तसेच कृषी सहाय्यक अस्मिता अहिरे हे करत असतात. सकाळपासुन स्वतः ट्रॅक्टरच्या साह्याने औषध फवारणी करून दिवसभर मजुरांकडून द्राक्ष शेतीतील कामाचे नियोजन करून जबाबदारी सांभाळत आहे.जिद्द आणि काटकसरीने उत्पादन खर्चात बचत होत असल्याने अस्मानी संकटावर मात करून दरवर्षी द्राक्ष उत्पादन मोठ्या प्रमाणात घेत आहे. तसेच पुनम यांना शैक्षणिक व सामाजिक कार्याची ओढ असल्याने खेडगाव विद्यालयात शालेय समिती सदस्य म्हणून त्यांची नेमणूक केली गेली आहे.(११ वरखेडा, १)
महिलांची प्रयोगशील शेतीकडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 9:08 PM
वरखेडा : पारंपारिक शेती पद्धतीतून मार्ग काढीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत महिला देखील शेतात वेगवेगळे प्रयोग राबवून प्रयोगशील शेती व्यवसायाकडे वळत असल्याचे चित्र दिंडोरी तालूक्यातील ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे.
ठळक मुद्देवरखेडा : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतात नवनवीन प्रयोग