सिडको : सिडको स्थापनेच्या अगोदरपासून असलेल्या मोरवाडी गावाची शासन दरबारी नोंद करावी यासाठी शिवसेना नगरसेवक किरण गामणे यांनी गावातील महिलांना बरोबर घेत नाशिक येथील जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. सुमारे तीन तासांहून अधिक वेळ ठिय्या केल्यानंतर अधिकाऱ्यांनी लवकरच याबाबत पाठपुरावा करण्यात येत असल्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.अनेक वर्षे उलटूनही मोरवाडी गावातील रहिवाशांचे शासन दप्तरी नोंद झालेली नसल्याने रहिवाशांना घरे खरेदी-विक्री करताना अडचणी निर्माण होत आहे. तसेच घरांवर कोणत्याही प्रकारचे कर्जदेखील मिळत नसल्याने याबाबत रहिवाशांमध्ये नाराजी आहे. गामणे यांनी याप्रकरणी जिल्हा अधीक्षक भुमि अभिलेख कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. सुमारे तीन तासांहून अधिक वेळ ठिय्या आंदोलन सुरु होते. या आंदोलनात उषा राजवाडे, बबिता सोनवणे, मंदा गवाने, रशिदा मनियार, योगीता दुसाने, संदीप धात्रक, माणिक उगले, गणेश सगरे, आनंत त्रिवेदी, सुरज शिंदे आदी सहभागी झाले होते.
नगरसेवकासह महिलांचा कार्यालयात ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 1:20 AM