नाशिक : ‘बालिकेवर अत्याचार करणाºयास कठोर शिक्षा द्या’,‘देवळालीच्या गावगुंडांचा बंदोबस्त करा, महिलांना सुरक्षा द्या’, ‘भयमुक्त देवळाली सुरक्षित देवळाली’ अशा घोषणा देवळालीच्या शेकडो महिलांनी पोलीस आयुक्तालयाच्या द्वारावर देत बालिकेवर अत्त्याचार करणाºया नराधमास फाशीची शिक्षा ठोठावण्याची मागणी शेकडो महिलांनी पोलीस आयुक्तांकडे के ली. देवळाली गाव परिसरातील सुलभ शौचालयात नैसर्गिक विधीसाठी आलेल्या नऊ वर्षीय चिमुरडीवर एका नराधमाने दहा दिवसांपूर्वी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. उपनगर पोलीस ठाण्यात रविवारी (दि.२२) संशयिताविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान, संशयित रवींद्र चौलालसिंग बहोत यास पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयापुढे हजर केले असता येत्या शनिवारपर्यंत (दि.२७) पोलीस कोठडी सुनावली. या नराधमास क ायद्याने कठोर शिक्षा द्यावी, या मागणीसाठी नगरसेवक सत्यभामा गाडेकर, सूर्यकांत लवटे व सुनीता कोठुळे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे शंभराहून अधिक महिलांचा जमाव सोमवारी (दि.२३) आयुक्तालयात धडकला. यावेळी पाच महिलांच्या शिष्टमंडळाला आयुक्तांच्या दालनात प्रवेश मिळणार असल्याचे सांगून उर्वरित महिलांना पोलिसांनी रोखल्याने सदर महिलांनी आयुक्तालयाच्या तळमजल्यावर ठिय्या देत ‘नराधमास फाशी झालीच पाहिजे,’ ‘देवळालीमधील गावगुंडांची दहशत संपलीच पाहिजे’ अशा घोषणा दिल्या. आयुक्तांच्या दालनामध्ये पीडित कुटुंबीयांच्या सदस्यांनाही पोलिसांनी प्रवेश नाकारल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. देवळालीगावातील गुंडांची दहशत तसेच आजूबाजूच्या झोपडपट्ट्यांमधून येत दहशत माजविणाºयांचा बंदोबस्त करावा तसेच पीडित बालिकेच्या कु टुंबीयांच्या पुनर्वसनासाठी लागणारा अहवाल आयुक्तांनी जिल्हाधिकाºयांकडे पाठवावा, अशा मागण्यांचे निवेदन पोलीस आयुक्त सिंगल यांना देण्यात आले आहे. निवेदनावर कैलास मोरे, विकास गिते, योगेश शिंदे, शशिकांत चौधरी यांच्यासह महिलांच्या स्वाक्षºया आहेत.आयुक्तांच्या दालनात जाण्यासाठी ‘तू-तू, मैं-मैं’देवळालीगावाच्या महिलांचा मोठा जमाव पोलीस आयुक्तालयात दाखल झाला. यावेळी बंदोबस्तावरील पोलिसांनी बहुसंख्य महिला व पुरुषांना तळमजल्यावरच रोखले. पहिल्या मजल्यावर नगरसेवकांसह पंचवीस ते तीस महिला पोहचल्या. यावेळी दालनात केवळ नगरसेवकांसोबत पाच महिलांना प्रवेश मिळणार असल्याचे सांगितल्यानंतर महिलांचा संताप वाढला. महिला पोलिसांनी यावेळी दालनात जाणाºया महिलांना रोखले असता त्यांच्यासोबत ‘तू-तू मैं-मैं’ झाली.
पोलीस आयुक्तालयात महिलांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 1:31 AM