कळवण : अभोणा येथील डांग सेवा मंडळाच्या कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व अभोणा पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सुरक्षा कवच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी अभोणा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल फुला यांनी महिला सुरक्षा कवचविषयी मार्गदर्शन करताना सांगितले की, महिलांनी होणाºया अत्याचाराविरोधात आवाज उठविल्याशिवाय अन्याय, अत्याचार कमी होणार नाहीत तसेच अन्याय अत्याचाराविरुद्ध नाही म्हणायला शिकावे.नाशिक ग्रामीण पोलिसांच्या वतीने जिल्ह्यात महिला सुरक्षा कवच योजना राबविली जात असून, या योजनेअंतर्गत पोलिसी दामिनी पथक महिला सहायता कक्ष यांची स्थापना करण्यात आली असून विद्यार्थिनींनी किंवा महिलांनी कुणी त्रास देत असल्यास, छेड काढत असल्यास सरळ पोलिसात तक्रार करावी त्यांची नावे गुप्त ठेवण्यात येतील व संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन केले.प्राचार्य डॉ. एस. आर. निकम यांनी प्रास्ताविक केले. महिलांवर समाजात होणारे अन्याय, अत्याचार समूळ नष्ट करण्यासाठी पोलिसांना त्यांच्या कार्यात महिलांचा सहभाग मिळावा म्हणून पोलीस सखी ही योजना नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे राबविण्यात येत असून, विद्यार्थिनींनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन अभोणा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल फुला यांनी केले.नाशिक ग्रामीण पोलिसांच्या वतीने सुरक्षा कवच या उपक्र मामुळे आम्हाला आता सुरिक्षत वाटत असत असल्याची भावना याप्रसंगी विद्यार्थिनींनी बोलून दाखवली.कार्यक्रम अधिकारी प्रा. रवींद्र पगार यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पोलीस हवालदार सुमित आवारी, प्रफुल्ल नंदाळे, अशोक काटे यांनी सहकार्य केले.नाशिक ग्रामीण पोलिसांतर्फेतयार केलेल्या महिला सुरक्षा कवच योजनेची चित्रफीत विद्यार्थिनींना दाखविण्यात आली. महिला त्यांच्यावर होणाºया अन्याय, अत्याचाराविरु द्ध थेट १०९१ हेल्पलाइनवर २४ तास आपलीतक्र ार नोंदवू शकतात. यातक्र ारीची दखल तत्काळ घेतली जाऊन कडक कारवाई नक्कीच केली जाईल, अशी ग्वाही फुला यांनी यावेळी दिली.
अभोणा महाविद्यालयात ‘महिला सुरक्षा कवच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2017 12:00 AM