मालेगाव : तिहेरी तलाक विधेयकाच्या विरोधात व शासनाने शरियतमध्ये हस्तक्षेप टाळावा या मागणीसाठी मुस्लीम वैयक्तिक कायदा मंडळाच्या नेतृत्वाखाली गुरुवारी शहरातील लाखो महिलांनी एल्गार पुकारत अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. तिहेरी तलाक विधेयकाचा निर्णय मागे घ्यावा या मागणीचे निवेदन प्रांताधिकारी अजय मोरे यांना सादर करण्यात आले. या मोर्चामुळे शहरातील सर्वच रस्त्यांवरील वाहतूक तब्बल दीड तास खोळंबली होती.मुस्लीम वैयक्तिक मंडळाला विश्वासात न घेता केंद्र सरकारने तीन तलाकबाबत मुस्लीम महिला (विवाहोत्तर संरक्षण) विधेयक २०१७ लोकसभेत मंजूर करून घेतले आहे. आता राज्यसभेत मंजूर करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. या विधेयकाला मुस्लीम वैयक्तिक मंडळाचा व महिलांचा तीव्र विरोध आहे.या पार्श्वभूमीवर मालेगावी गुरुवारी (दि. १५) ऐतिहासिक मूक मोर्चा काढण्यात आला. मुस्लीम वैयक्तिक मंडळाचे सचिव मौलाना उमरैन महेफुज रहेमानी यांच्या नेतृत्वाखाली मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चाला येथील एटीटी हायस्कूलच्या प्रांगणापासून दुपारी अडीच वाजता प्रारंभ झाला. मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मोसमपूल, महात्मा गांधी पुतळा, कॅम्परोडमार्गे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ धडकला. मोर्चात लाखोंच्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.मोर्चात अग्रभागी असलेल्या महिला अपर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ तर एटीटी हायस्कूलच्या आवारापर्यंत महिला रस्त्यावरून येतच होत्या. मोर्चाचे सभेत रूपांतर झाल्यानंतर मौलाना उमरैन महेफुज रहेमानी यांनी केंद्र शासनावर कडाडून टीका केली. यानंतर दुआपठण करण्यात आले.यावेळी माजी महापौर ताहेरा शेख रशीद, रफीयाबिंत अब्दुल खालीक, आयेशा अब्दुल कादीर उस्मानी, अफसा शेख आसीफ, शबाना शेख मुक्तार, शबीना मुज्जमील बफाती, नाजमीन आरीफ हुसेन, शान-ए-हिंद निहाल अहमद, हुमाकौसर फकरुद्दीन, अनिका फरहीन अब्दुल मलिक, शाकेरा हाजी मोहंमद युसुफ, सायराबानो शाहीद अहमद आदी महिलांच्या शिष्टमंडळाने प्रांत अधिकारी अजय मोरे यांना मागणीचे निवेदन सादर केले.या मोर्चात आमदार आसिफ शेख, महापौर रशीद शेख, माजी आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल, माजी महापौर अब्दुल मलिक, नगरसेवक बुलंद एकबाल, मुस्तिकीन डिग्नीटी, मौलाना कय्युम कासमी, मौलाना हमीद जमाली, सुफी गुलाम रसूल, शफीक राणा, शाकीर शेख, कलीम दिलावर, सलीम अन्वर आदींसह राजकीय, सामाजिक पदाधिकारी व लाखोंच्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.महिलांनी काढलेल्या मूक मोर्चामुळे प्रशासनाची चांगली धावपळ उडाली होती. मालेगावच्या इतिहासात पहिल्यांदाच मुस्लीम महिला बहुसंख्येने घराबाहेर पडून रस्त्यावर उतरल्या होत्या. पोलीस प्रशासनाने मोर्चाच्या मार्गावर कडक बंदोबस्त ठेवला होता. स्थानिक पोलिसांसह बाहेरगावाहून पोलिसांची अधिकची कुमक मागविण्यात आली होती. साध्या वेशातील पोलीसही परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते. मोर्चा शांततेत पार पडला, तर महसूल प्रशासनानेही या परिस्थितीकडे विशेष लक्ष ठेवले होते.कडक पोलीस बंदोबस्तइस्लामी शरियत हमारा सन्मान है। शरियत हमारा गर्व है।, हम कानुन ए शरियत के कटीबद्ध है। यासह विविध घोषणा असलेले फलक महिलांनी हातात घेतले होते. मोर्चात लाखोंच्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. मोर्चा शहरवासीयांसाठी लक्ष्यवेधी ठरला होता. ठिकठिकाणी सामाजिक संस्थांनी पिण्याच्या पाण्याची सोय केली होती, तर स्वयंसेवकांकडून मोर्चात सहभागी झालेल्या महिलांना संरक्षण देण्यात आले होते. मोसमपुलावर दोन्ही बाजूने महिला उभ्या होत्या. मोर्चात सहभागी झालेल्या महिलांसाठी रुग्णवाहिका व वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली होती. मोर्चादरम्यान पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. शहरातील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली होती. या मोर्चामुळे तब्बल दीड तास संगमेश्वर, नवीन बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील वाहतूक बंद पडली होती. यामुळे बाहेरगावहून येणाºया प्रवाशांना ताटकळत उभे रहावे लागले.
मालेगाव येथे महिलांचा मूक मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 12:27 AM
मालेगाव : तिहेरी तलाक विधेयकाच्या विरोधात व शासनाने शरियतमध्ये हस्तक्षेप टाळावा या मागणीसाठी मुस्लीम वैयक्तिक कायदा मंडळाच्या नेतृत्वाखाली गुरुवारी शहरातील लाखो महिलांनी एल्गार पुकारत अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. तिहेरी तलाक विधेयकाचा निर्णय मागे घ्यावा या मागणीचे निवेदन प्रांताधिकारी अजय मोरे यांना सादर करण्यात आले. या मोर्चामुळे शहरातील सर्वच रस्त्यांवरील वाहतूक तब्बल दीड तास खोळंबली होती.
ठळक मुद्देतिहेरी तलाक विधेयकाला विरोध शरियतमधील हस्तक्षेप टाळण्याची मागणी प्रांताधिकाºयांना निवेदन