नाशिकरोड : महिला क्रीडा-महोत्सवातून चांगले खेळाडू निर्माण होऊन त्यांनी शहर, देशाचे नाव मोठे करावे, महिलाही पुरुषांच्या बरोबरीने काम करत असून, त्यांनीदेखील खेळात नाव उज्ज्वल करावे, असे प्रतिपादन आमदार योगेश घोलप यांनी केले.दत्तमंदिररोड मनपा शाळा क्रमांक १२५ च्या मैदानावर सावित्री ते जिजाऊ जयंतीनिमित्त जिजामाता महिला शिक्षण प्रसारक मंडळ व समाजसेवा मंडळातर्फे मातृविश्व महिला क्रीडामहोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी घोलप बोलत होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आयोजक नगरसेविका सत्यभामा गाडेकर, ज्योती खोले, रमेश धोंगडे, केशव पोरजे, राजू लवटे, श्याम खोले, योगेश गाडेकर, मंगला भास्कर, पहिलवान बाळू बोडके, प्रवीण पाळदे, दीपक जुंद्रे, ज्ञानेश्वर शिंदे, सुधीर पाळदे, अर्जुन मोरे, काशीनाथ चौधरी आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते श्रीफळ फोडुन मातृविश्व महिला क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन झाले. पाच दिवसीय क्रीडा महोत्सवात कुस्ती, कबड्डी, खो खो, हॉलीबॉल, मल्लखांब या खेळाच्या स्पर्धा होणार आहे.प्रास्तविकात नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांनी केले. यावेळी स्वप्नील सहाणे, किरण पाटोळे, प्रथमेश झुटे, कुणाल सहाणे, पवन फोकणे, लंकेश गाडेकर, सुकदेव लोंढे आदिंसह खेळाडू उपस्थित होते.
नाशिकरोडला महिला क्रीडामहोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 1:54 AM