नाशिक : महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी आरोग्यम् धनसंपदाचा मंत्र जपत वुमन्स वॉकथॉन उपक्रम राबविण्यात आला. गोदाकाठावर सुमारे तीन किलोमीटर अंतर पार करीत १२00 महिलांनी सहभाग घेत ‘चला सबलीकरणाकडून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू या’ असा संदेश दिला.या वॉकथॉन उपक्रमाला शहरातील विविध भागातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रविवारी पहाटेची मंद गार वाऱ्याची झुळूक आणि पक्षांचा किलबिलाट, झाडांच्या पानांची सळसळ असा मनोहारी नजराणा गोदाकाठी होता. त्याचवेळी वॉकथॉनमध्ये सहभागी महिलांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले यांच्यासह थोर व वीर महिलांची वेशभूषा करून आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला. या उपक्रमात सहभागी महिलांनी आपापले वेगवेगळे गट तयार करून आकर्षक वेशभूषा केली होती. यावेळी उपक्रमात सहभागी झालेल्या महिलांना बक्षीस वितरण करण्यात आले. (प्रतिनिधी)
आरोग्यम् धनसंपदेसाठी महिलांचे ‘वॉकथॉन’
By admin | Published: March 07, 2017 2:08 AM