शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोठी घडामोड! प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांनी निर्णय बदलला, सिंदखेड राजामध्ये शिंदेंच्या उमेदवाराला पाठिंबा दिला
2
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
4
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
5
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
6
लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
7
राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...
8
Maharashtra Election 2024 Live Updates: मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, खेळी फिरणार?
9
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
10
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
11
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
12
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
13
Mamaearth Shares: कंपनीचा शेअर आपटला; २० टक्क्यांची घसरण, IPO प्राईजच्याही खाली आला भाव
14
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
15
IND vs AUS टेस्टआधी आणखी एक ट्विस्ट; स्पेशल कॉलनंतर पुजारा 'फ्लाइट मोड'वर
16
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
17
शाळांच्या सुट्टीबद्दल शिक्षण आयुक्तालय आणि महापालिकेचा परस्परविरोधी निर्णय
18
'मुन्नाभाई MBBS'मधला स्वामी आता दिसतो खूपच वेगळा, लेटेस्ट फोटो पाहून चाहते झाले अवाक्
19
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
20
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!

सारताळे आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2018 12:12 AM

नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील आश्रमशाळेतील कर्मचाºयांनी शुक्रवारी (दि.३१) नंदुबार येथील घटनेचा निषेध करून काळया फिती लावून कामकाज केले. गेल्या दोन दिवसांपूर्वी नंदुरबार जिल्ह्यातील सलसवाडी शासकीय आश्रमशाळेत इयत्ता पाचवीचा विद्यार्थी सचिन मोरे याचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला.

साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील आश्रमशाळेतील कर्मचाºयांनी शुक्रवारी (दि.३१) नंदुबार येथील घटनेचा निषेध करून काळया फिती लावून कामकाज केले. गेल्या दोन दिवसांपूर्वी नंदुरबार जिल्ह्यातील सलसवाडी शासकीय आश्रमशाळेत इयत्ता पाचवीचा विद्यार्थी सचिन मोरे याचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला.  मयत विद्यार्थ्याचे पालक व नातेवाईक आदींच्या जमावाने शिक्षक, मुख्याध्यापक, अधीक्षक, प्रकाल्पाधिकारी व तहसीलदारांना जबाबदार धरून त्यांच्यावर हल्ला करून मारहाण केली. या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी सारताळे येथील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित आश्रमशाळेतील प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचाºयांनी काळ्या फिती लावून कामकाज करत निषेध नोंदविला.याप्रसंगी प्राचार्य रवींद्र भामरे, मुख्याध्यापक नम्रता शेवाळे, अधीक्षक रवींद्र पाटील, कैलास पगार, भगवान हिरे, महेंद्र जाधव , वाल्मिक दराडे, भूषण बोरसे, साहेबराव सोळसे, राजेंद्र पगार, समाधान चौधरी, संजय पगार, मोतिलाल जगताप, भैया सोळुंके, संदीप पगार, रवंींद्र पाटील,मिथून पाटील, अशोक पाटील आदींनी काळ्या फिती लावून कामकाज करत निषेध नोंदविला.तर आश्रमशाळा चालणार कशा?निवासी आश्रमशाळांमध्ये दुर्दैवी घटना घडल्या तर प्रत्येक गोष्टीसाठी शाळा, प्रशासनच जबाबदार असते असे नाही. मात्र आई-वडिलांपेक्षाही विद्यार्थ्यांची काळजी घेणाºया शालेय प्रशासन, अधिकारी व कर्मचारी यांना अशा पद्धतीने वागणूक दिली जात असेल तर आश्रमशाळा चालणार तरी कशा? यासंदर्भात प्रशासनाने हल्लेखोरांवर कठोर कारवाई करून कर्मचाºयांच्या सुरक्षेसाठी शासनाने कडक कायदे करावेत, अशी भावना सर्व आश्रमशाळेच्या शिक्षक कर्मचाºयांमधून व्यक्त होत आहे.

टॅग्स :SchoolशाळाEmployeeकर्मचारी