नाशिकरोड : पळसे गावातून स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पुलाचे काम अद्यापपर्यंत ठेका घेतलेल्या चेतक कंपनीने केले नसल्याने येणाºया पावसाळ्यात पळसेकरांचे मोठे हाल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सरपंच अजित गायधनी यांनी शिष्टमंडळासह राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता विवेक माळुंदे, चेतक कंपनीचे प्रकल्प संचालक सुनील भोसले याची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी सर्व्हिस रोडवर पथदीप बसवावे यांसह इतर समस्यांवर सकारात्मक चर्चा करून प्रत्यक्ष कामांची पाहणी केली.पळसे गावातून जाणाºया स्मशानभूमी रस्त्याची गेली पाच ते सहा वर्षांपासून अत्यंत बिकट अवस्था झाली असून, या रस्त्यावर पुलाचीअनेक दिवसांची मागणी असतानादेखील पळसेकरांना केवळ आश्वासनच मिळत होते. या सर्व्हिस रोडवर कुठल्याही प्रकारचे पथदीप नाही तसेच स्मशानभूमीकडे जाणाºया मुख्य रस्त्याचे व पुलाचे काम सुरू केले नव्हते. पावसाळा सुरू होण्यापूर्वी पुलाचे काम सुरू करून सर्व्हिस रोडवर पथदीप बसवावे, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला होता. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे विभागीय उपअभियंता सी. आर. सोनवणे, मनोज पाटील, सुनील भोसले, सरपंच अजित गायधनी, गणेश गायधनी, शाखा अभियंता सतीश आहेर, स्वप्नील पाटील यांची संयुक्त बैठक पार पडून पुलाचे काम त्वरित सुरू करावे, पथदीप बसवावे व इतर समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर सर्वांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी चेतक कंपनीच्या अधिकाऱ्यांना पुलाचे काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. यावेळी दिलीप गायधनी, संदीप गायधनी, संजय डहाळे, समाधान गायधनी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
पळसे येथील पुलाचे काम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2020 10:00 PM