त्र्यंबकेश्वर : हेदपाडा ते मेटकावरा रस्त्यासह पुलाचे काम दोन वर्षांपासून अर्धवट स्थितीत असून नागरिकांसह वाहन चालकांची गैरसोय होत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. हेदपाडा हे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण ग्रामपंचायतमधील अतिशय दुर्गम आदिवासी पाडे असलेले गाव आहे. या गावाला जाण्यासाठी नदीतून असणाऱ्या रस्त्यावर पूल बांधण्याचे काम वर्षानुवर्षं रेंगाळले आहे.जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विनायक माळेकर यांनी गावकऱ्यांसह सदर पुलाला भेट दिली. त्यात रस्त्यावर खडी टाकून दोन वर्षे होत आले आहेत; पण रस्त्याचे काम अजूनही सुरू झालेले नसल्याने हेदपाडा येथील लोकांना पावसात जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. गावातून बाहेर पडण्यासाठी तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना दररोज गावात येण्यासाठी जीव हातात घेऊन प्रवास करावा आहे. गत पावसाळ्यात दोन महिलांना नदी पार करत असताना आपल्या जीव गमवावा लागला.पुलाचे व रस्त्याचे काम अर्धवट करण्यात आल्याने व संबंधित ठेकेदाराने कामाकडे पाठ फिरविली आहे. तो कामाकडे फिरकत नसल्याने नागरिकांना अडचणीचा सामोरे जावे लागते. ----------------------रस्त्याचे व पुलाचे अर्धवट काम गेल्या दीड वर्षापासून रखडलेले आहे. अधिकारी व ठेकेदार यांच्या दुर्लक्षामुळे येथील नागरिकांना पावसळ्यात जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागत आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत रस्त्याचे व पुलाचे अपूर्ण काम मार्गी लावावे यासाठी स्थानिक शेतकºयांकडून पाठपुरावा केला जात आहे. परंतु नागरिकांना दाद मिळत नसल्याने वरिष्ठ अधिकाºयांनी यात लक्ष घालावे.विनायक माळेकरसदस्य, जिल्हा नियोजन समिती-----------------------ठेकेदाराची माणसे निघून गेल्याने काम बंद आहे. अर्धे बिल दिले गेले आहे. पुलास निधी प्राप्त झालेला नाही.विजय भदाणे, अभियंता
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पुलाचे काम अर्धवट स्थितीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 5:48 PM
त्र्यंबकेश्वर : हेदपाडा ते मेटकावरा रस्त्यासह पुलाचे काम दोन वर्षांपासून अर्धवट स्थितीत असून नागरिकांसह वाहन चालकांची गैरसोय होत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. हेदपाडा हे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण ग्रामपंचायतमधील अतिशय दुर्गम आदिवासी पाडे असलेले गाव आहे. या गावाला जाण्यासाठी नदीतून असणाऱ्या रस्त्यावर पूल बांधण्याचे काम वर्षानुवर्षं रेंगाळले आहे.
ठळक मुद्दे हेदपाडा ते मेटकावरा : रस्त्यासह पुलाचे काम अपूर्ण