प्रभाव लोकमतचमातोरी : गेल्या अनेक महिन्यापासून दुरवस्था झालेल्या मुंगसरे ते चांदशी रस्त्याचे काम अखेर ग्रामस्थांच्या आक्रमक पावित्र्याचे हाती घेण्यात आले असून, सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात केली आहे.या रस्त्याची दुरवस्था झाल्याने स्थनिक नागरिक व वाहनचालकांना रस्त्याने येणे जाणे मुश्कील झाले होते. या बाबत मागणी होऊनही अधिकारी वर्ग दुर्लक्ष करत होते. कोरोनाचे करणे देत काम करण्यास चालढकल केली जात होती . याबाबत ग्रामविकास मंचने सर्व अधिकारी वर्गाची भेट घेत याबाबतचा लेखी अहवाल त्यांच्या समोर मांडला आणि रस्ता सद्य स्थितीत दुरुस्त न झाल्यास अधिकारी वर्गाला गाव बंदी करण्याचा पवित्रा घेतला होता. या बाबतचे वृत्त 'लोकमत' मध्ये 'रस्ता कि पाण्याचा तलाव' या शीर्षकाखाली प्रसिद्ध करण्यात आली होती. त्याची दखल घेत अधिकारी वर्गाने आता या रस्त्यावर खडी टाकून खड्डे बुजविण्यास सुरवात केली आहे. दिवाळी नंतर हा रस्ता सार्वजनिक बाधकाम विभागामार्फत चागल्या प्रकारे दुरुस्त करण्यात येणार असल्याचे आश्वासन हि देण्यात आले. त्यामुळे स्थानिकांनी समाधान व्यक्त केले आहे.