सिन्नर : शहरातील गोसावी समाज तसेच महानुभव पंथ समाजाच्या स्मशानभूमीचे काम नगर परिषदेमार्फत सुरू आहे. सदर काम ५० टक्के पूर्ण झाले असून, माजी आमदार राजाभाऊ वाजे, नगराध्यक्ष किरण डगळे यांनी या कामाची पाहणी केली.
या कामासाठी नगर परिषदेने १६ लाख ४८ हजार रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती नगराध्यक्ष डगळे यांनी दिली. स्मशानभूमीचे काम होण्यासाठी गोसावी समाज व महानुभव पंथ समाजबांधवांनी माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्याकडे मागणी केली होती. त्यातील तांत्रिक अडचण सोडवून ऐश्वर्य गार्डनच्या मागील बाजूस स्मशानभूमीचे काम सुरू आहे. हे काम आता ५० टक्के पूर्ण झाले आहे. या कामाची पाहणी केल्यानंतर गटनेते हेमंत वाजे, गोसावी समाज तालुकाध्यक्ष भानुदासपुरी गोसावी, सरचिटणीस वसंत गोसावी यांनी कामाबद्दल समाधान व्यक्त केले.
फोटो - २६ सिन्नर ३
सिन्नर येथील गोसावी समाज तसेच महानुभव पंथ समाजाच्या स्मशानभूमीच्या कामाची पाहणी करताना माजी आमदार राजाभाऊ वाजे, नगराध्यक्ष किरण डगळे, हेमंत वाजे, भानुदासपुरी गोसावी, वसंत गोसावी आदी.
===Photopath===
260521\26nsk_25_26052021_13.jpg
===Caption===
सिन्नर येथील गोसावी समाज तसेच महानुभव पंथ समाजाच्या स्मशानभूमीच्या कामाची पाहणी करतांना माजी आमदार राजाभाऊ वाजे, नगराध्यक्ष किरण डगळे, हेमंत वाजे, भानुदासपुरी गोसावी, वसंत गोसावी आदी.