लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : येथील मविप्र संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयात संस्थेचे अध्यक्ष संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांचा जन्मदिवस हा समाजदिन म्हणून साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्रचे माजी संचालक व सिन्नर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत होते. भगत यांच्या हस्ते कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते संस्थेच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. भगत यांनी मार्गदर्शन केले. कर्मवीरांचे कार्य नवीन पिढीला प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन भगत यांनी केले. मुख्याध्यापक भाऊसाहेब कहांडळ यांनी प्रास्ताविक केले.यावेळी शालेय समिती सदस्य भाऊसाहेब गोजरे, इंदुमती कोकाटे, अर्जुनराव गोदरे, अभिनव बालविकास मंदिराचे मुख्याध्यापक एस. आर. आव्हाड, उपमुख्याध्यापक एन. बी. आहेर, पर्यवेक्षक पी. डी. जाधव, पर्यवेक्षक बी. टी. नवले, व्ही. एन. शिंदे, डी. व्ही. नवले, व्ही. एन. जाधव, व्ही. एस. ठाकरे, एम. पी. देशपांडे, एस. डी. सहाणे, वसंत पगार आदींसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शिवनाथ पांगारकरयांनी सूत्रसंचालन केले. उपमुख्याध्यापक एन. बी. आहेर यांनी आभार मानले.
कर्मवीरांचे कार्य नवीन पिढीला प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 10:22 PM
सिन्नर : येथील मविप्र संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयात संस्थेचे अध्यक्ष संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांचा जन्मदिवस हा समाजदिन म्हणून साजरा करण्यात आला.
ठळक मुद्देकृष्णाजी भगत : सिन्नरच्या वाजे विद्यालयात समाजदिन साजरा