- शैला संजय नेरकर, डांगसौंदाणे. (१७ शैला नेरकर)
-------------------------
पेठ तालुक्यात जवळपास १६५ आशासेविका व गटप्रवर्तक शासनाच्या सेवेत कार्यरत आहेत. अतिदुर्गम भागात, वाडी-वस्तीवर आरोग्याच्या सुविधा देत असताना अत्यल्प मानधनात काम करावे लागत आहे. कोरोनासारख्या महामारीत आशासेविका व गटप्रवर्तक यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून सेवा करत असल्याने शासनाने आमच्या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करून पूर्तता करावी.
-योगिता गवळी, आशा गटप्रवर्तक, पेठ
----------------------------
१२-१२ तास काम करूनही फक्त दोन ते अडीच हजार रुपये मिळतात. पती दम्याने आजारी आहेत. कोरोनाकाळात गावोगावी, वस्त्या, गल्ल्या व घराघरांत जाऊन जीव धोक्यात घालून सर्व्हे केला. प्रसूती, लसीकरण केले. कोरोनाग्रस्त रुग्णांशी संवाद साधला. सध्याच्या मानधनात घरभाडे व लाइट बिलसुद्धा निघत नाही. वेळप्रसंगी मजुरी करून घर चालवते. किमान १८ हजार रुपये महिन्याला मिळावे, अशी आमची मागणी आहे.
- शालिनी चव्हाण, आशा वर्कर (१७ शालिनी चव्हाण)
--------------------------
आम्ही कोरोना काळात दोन वर्षांपासून रात्रंदिवस काम केले. आम्हाला त्याचा पुरेसा मोबदला अजूनपर्यंत मिळाला नाही. जिवाची पर्वा न करता काम केलेल्या आम्हा आशासेविकांना शासनाने मानधनात वाढ करावी. आशासेविकांच्या परिवाराला सुरक्षा कवच देण्यात यावे. कोरोनाकाळात काम करत असताना आपत्ती आल्यास परिवाराला नुकसान भरपाई देण्यात यावी. आमच्या विविध मागण्या शासनाने मान्य कराव्यात व आम्हाला न्याय द्यावा.
- शोभा बारावकर, आशासेविका, घोटी (१७ शोभा बारावकर)
===Photopath===
170621\17nsk_6_17062021_13.jpg
===Caption===
१७ शैला नेरकर