दिंडोरी/येवला : मांजरपाडा प्रकल्पाच्या बोगद्याचे केवळ १२० मीटर काम बाकी असून, दररोज १.८ मीटर बोगद्याचे काम केले जात असल्याने ३१ जानेवारीपर्यंत बोगद्याचे काम पूर्ण होईल त्याचबरोबर धरणाचे अपूर्ण काम एप्रिल २०१९ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी प्रकल्पस्थळी प्रत्यक्ष पाहणी करताना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.शनिवारी छगन भुजबळ यांनी मांजरपाडा प्रकल्पाच्या अधिकाºयांसमवेत दिंडोरी तालुक्यातील देवसाने व सुरगाणा तालुक्यातील मांजरपाडा येथील बोगद्याची व धरणाची प्रत्यक्ष पाहणी करून जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांसोबत चर्चा केली. सदर प्रकल्पाच्या ८.९६ किमी लांबीच्या बोगद्यापैकी १२० मीटर काम अपूर्ण आहे, तर ३.२० किमी लांबीच्या उघड्या चराचे काम पूर्ण झाले तसेच धरण आणि सांडव्याचे सुमारे ८० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण करण्यात आलेले आहे. मांजरपाडा या महत्त्वाकांक्षी वळण योजनेद्वारे नाशिक जिल्ह्णातील पश्चिमवाहिनी नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी या प्रकल्पाद्वारे अडवून ८४५ दलघफु पाणी बोगद्याद्वारे गोदावरी खोºयात वळवले जाणार आहे. यातील १०० दलघफु पाणी स्थानिक वापरसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. सिंचन विषयक चौकशी समितीच्या अहवालानुसार राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडून तपासणी करण्याच्या यादीमध्ये या प्रकल्पाचा समावेश केल्यामुळे सुधारित प्रशासकीय मान्यतेवाचून हे काम आॅक्टोबर २०१४ पासून बंद पडले होते. विशेष म्हणजे सन २०१४-१५ मध्ये छगन भुजबळ यांनी या प्रकल्पसाठी ७० कोटी निधी उपलब्ध करून दिलेला होता,मात्र सत्तापरिवर्तनांमुळे हे काम रखडले होते.राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी पुढाकार घेतल्याने २००९ साली नाशिक येथे राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न होऊन सदर बैठकीमध्ये या वळण योजनांना मंजुरी देण्यात आलेली होती. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, आमदार नरहरी झिरवाळ, राजेंद्र जाधव, दिलीप खैरे, अॅड. रवींद्र पगार, जयवंतराव जाधव, डॉ.भारती पवार, राधाकिसन सोनवणे, संजय बनकर, महेंद्र काले, प्रकाश वडजे, अरुण थोरात यांच्यासह कार्यकारी अभियंता गिरीश संघांनी, उपकार्यकारी अभियंता विश्वास दराडे आदी उपस्थित होते.गुजरातकडे जाणारे पाणी अडवणारसदर प्रवाही वळण योजनांमध्ये सुरगाणा तालुक्यातील मांजरपाडा तर दिंडोरी तालुक्यातील गोळशी महाजे, ननाशी, पायर पाडा, प्रिंप्रज, आंबेगाव, झालीर्पाडा, धोंडाळपाडा, चाफ्याचापाडा, रानपाडा, चिमणपाडा, आंबाड, गोळशी, हट्टीपाडा, पळसविहीर, चिल्लरपाडा इत्यादी वळण योजनांचा समावेश आहे. या प्रवाही योजनांच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्णातील पाणलोट क्षेत्रातील पश्चिम वाहिनी नद्यांचे गुजरातकडे वाहून जाणारे पाणी गोदावरी खोºयामध्ये वळवले जाणार आहे. हे पाणी नाशिक जिल्ह्णातील सुरगाणा, दिंडोरी, चांदवड, निफाड, येवला या तालुक्यांना उपलब्ध होणार असून येथील क्षेत्र मोठ्या प्रमाणात सिंचनाखाली येणार आहे. त्याचबरोबर सुरगाणा व दिंडोरी तालुक्यातील स्थानिक शेतकºयांच्या वापरासाठी पाणी राखीव ठेवण्यात येणार आहे.
मांजरपाडा बोगद्याचे काम जानेवारीअखेर होणार पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 1:40 AM