सदरचे केंद्र सुरू झाल्यानंतर कोरोना रुग्णांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. आमदार सुहास कांदे यांनी मनमाड वैद्यकीय अधीक्षक डॉ. जी.एस. नरवणे, मुख्याधिकारी विजयकुमार मुंडे यांच्या समवेत सेंटरला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. कोविड सेंटरसाठी लागणाऱ्या सोयी-सुविधा शासनाकडून उपलब्ध होतील तेव्हा होतील, परंतु रुग्णांची हेळसांड होता कामा नये. त्यासाठी सर्व प्रकारची मदत केली जाणार असल्याचे कांदे यांनी सांगितले. या वेळी शिवसेना तालुकाप्रमुख किरण देवरे, शहरप्रमुख मयूर बोरसे आदी उपस्थित होते.
फोटो : २० मनमाड कांदे
मनमाड येथे सुरू होत असलेल्या कोविड सेंटरची पाहणी करताना आमदार सुहास कांदे. समवेत विजयकुमार मुंढे, डॉ. जी.एस. नरवणे आदी.
===Photopath===
200421\20nsk_36_20042021_13.jpg
===Caption===
फोटो : २० मनमाड कांदे मनमाड येथे सुरू होत असलेल्या कोविड सेंटरची पाहणी करताना आमदार सुहास कांदे. समवेत विजयकुमार मुंढे,डॉ. जी. एस. नरवणे आदी.