शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
3
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
4
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
5
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
6
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
7
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
8
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
9
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
10
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
11
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
12
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
13
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
14
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
15
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
16
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
17
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
18
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
19
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
20
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?

नांदगाव नगर परिषदेचे कामकाज बेशिस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:17 AM

येथील नगर परिषदेच्या कामकाजात आलेल्या बेशिस्तीला अजूनही लगाम लावण्यात आलेला नाही, अशी तक्रार नगराध्यक्ष राजेश कवडे यांनी उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांच्याकडे केली आहे. नगराध्यक्षांनी भ्रमणध्वनीवरून संपर्कसाधला असता मंगरुळे यांनी कारवाई (दुसऱ्यांदा) करण्याचे आश्वासन दिले.

नांदगाव : येथील नगर परिषदेच्या कामकाजात आलेल्या बेशिस्तीला अजूनही लगाम लावण्यात आलेला नाही, अशी तक्रार नगराध्यक्ष राजेश कवडे यांनी उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांच्याकडे केली आहे. नगराध्यक्षांनी भ्रमणध्वनीवरून संपर्कसाधला असता मंगरुळे यांनी कारवाई (दुसऱ्यांदा) करण्याचे आश्वासन दिले.  बहुसंख्य कर्मचारी कार्यालयीन वेळेत कार्यालयात उपस्थित झाले नव्हते, याकडे नगराध्यक्षांनी उपजिल्हाधिकायांचे लक्ष वेधले. प्रशासनातील अपूर्ण कर्मचारी वर्ग, बेशिस्त व दैनंदिन कामांसह विविध विकासकामांची परवड या विषयांचे गाºहाणे घेऊन नगराध्यक्ष राजेश कवडे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने दि. १६ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांची भेट घेतली होती. जिल्हाधिकाºयांनी त्यावेळी दिलेल्या आश्वासनांची अजूनही पूर्तता झालेली नाही. त्यावेळी जिल्हाधिकाºयांनी येवला-मनमाड येथील अभियंता यांना अतिरिक्त पदभार देणे, दररोजच्या हजेरीसाठी बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित करणे तसेच वेळेवर न येणाºयांसाठी अधिकारी नगर परिषदेच्या कार्यालयात अचानक पाठवून तपासणी करावी, अशा सूचना उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांना दिल्या  होत्या; मात्र अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.११ पदे रिक्त, १८० ठरावांची फाईलनांदगाव नगर परिषदेत लेखापाल (२), स्थापत्य अभियंता (२) व संगणक अभियंता (१), पाणीपुरवठा अभियंता (१), सहा. कर निरीक्षक (१), सहा. मिळकत व्यवस्थापक (१), सहा. खरेदी पर्यवेक्षक (१), अग्निशमन पर्यवेक्षक (१), सहा. नगररचनाकार (१) ही महत्त्वाची पदे रिक्त आहेत. १२ पैकी ११ पदे रिक्त आहेत. प्रशासनाने कार्यवाही न केलेल्या १८० ठरावांच्या प्रतींची मोठी फाईल जिल्हाधिकारी यांना देऊन नगरसेवकांनी याकडे लक्ष वेधले होते. प्रकरणाची गंभीर दखल घेऊन उपरोल्लिखित मुद्द्यावर त्वरित कारवाईचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले होते. परंतु नगर परिषदेत आजही ‘जैसे थे’च परिस्थिती आहे.सहा दिवसाआड पाणीपुरवठावाढत्या तपमानामुळे पाण्याची अधिक गरज असताना सहा दिवसाआड पाण्याचा पुरवठा होत असलेले पाण्याचे आवर्तन दहा ते पंधरा दिवसांपर्यंत लांबणीवर पडत आहे. शहरातील दुकानदारांची व वाहनांची अतिक्र मणे पायी चालणाºयांसाठी अडथळा ठरत आहेत. नगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. ग्रामविकास राज्यमंत्री दादाभाऊ भुसे यांनी या प्रकरणी दिलेले निर्देश कुचकामी ठरले आहेत. पालिका निवडणुकीत भुसे यांनी नवीन पाणीपुरवठा योजना देण्याची घोषणा केली होती ती जणू हवेतच विरली असल्याची भावना नागरिकांमधून उमटत आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय