जोरण - बागलाण तालुक्यातील जोरण येथील शेतकºयाच्या पुढाकाराने विंचुरे शिवारातील पाझर तलावातील गाळ काढण्यास सुरूवात परिसरातील सर्व शेतकरी एकत्र येवून हा निर्णय हाती घेतला आहे.गेल्या अनेक वर्षापासुन या धरणातील गाळ उपसा केला नव्हता. धरणात प्रचंड प्रमाणात गाळ असल्यामुळे धरणाची खोली कमी झाली होती व तसेच पाणी साठवण क्षमता कमी झाली होती. धरणातील पाणी फक्त शेतकºयांना दोन तीन महिन्याचा फायदा होत व ऐन उन्हाळ्यात पाणी राहत नसल्याने जास्त दिवस पाणीसाठा राहत नव्हता तर येथील शेतकºयांच्या ही बाब लक्षात आली की. गाळ उपसा केला तर गाळ हा शेतीसाठी उपयुक्त ठरणार व धरणाची खोलीही वाढणार खोली वाढल्याने पाण्याचीही क्षमताही वाढणार आहे. त्यासाठी जोरण येथील शेतकºयांनी सार्वजनिक वर्गणी करु न जेसिबी , टॅक्टर यांच्या साह्याने धरणातील गाळ उपसा करण्यासाठी सुरवात केली आहे शासन दरबारी न शासनाचा कुÞठलाही निधी न घेता व कुठल्याही राजकीय पुढाºयाची मदत न मागता शेतकºयांनी स्वखर्चातून गाळ उपसा करण्याचे काम हाती घेतले आहे .
जोरण येथे धरणातील गाळ काढण्याचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2018 2:55 PM