शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

जायगाव येथे रेंगाळलेले रस्त्याचे काम अखेर सुरू

By admin | Published: October 21, 2016 1:42 AM

तत्काळ दखल : महिनाभरापासून काम होते ठप्प; ग्रामस्थांमध्ये समाधान

नायगाव : सिन्नर तालुक्यातील जायगाव येथील रस्ता रुंदीकरणाच्या मार्गातील अतिक्रमणे हटविल्यानंतरही शिंदे-पाटपिंप्री रस्त्याचे काम रखडले तसेच गावातील रस्ता मोठ्या प्रमाणात खोदून ठेवल्याने धुळीच्या त्रास आणि अरुंद झालेला रस्ता यामुळे अपघातांचे प्रमाण वाढल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी या रस्त्याच्या कामाला प्रारंभ झाला. यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.महिन्याभरापासून जायगाव येथे गावालगतचा रस्ता खोदून ठेवल्याने गावातील मारुती मंदिर ते देशवंडी फाट्यापर्यंत रस्त्याची एक बाजू खोदण्यात आली आहे. तथापि, रस्ता खोदल्यानंतर अतिक्रमण असल्याची सबब पुढे करीत संबंधित निर्मिती कन्स्ट्रक्शनने हे काम बंद केले होते. खोदकामामुळे रस्ता अरुंद झाल्याने या गर्दीच्या ठिकाणी दोन वाहने जाण्याच्या अडचण निर्माण होत होती. रस्त्याच्या कडेला पडलेल्या माती व धुळीचा प्रवाशांबरोबरच ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात त्रास होत होता. वर्दळीच्या ठिकाणी शाळेतील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांची सकाळ-सायंकाळी चांगलीच दमछाक होत होती. अतिक्रमण काढल्यानंतरही काम रखडले असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध केले होते. यानंतर संबंधित ठेकेदाराने दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. तथापि, लवकरात लवकर रस्त्याचे काम मार्गी लावण्याची मागणी जायगाव ग्रामस्थांनी केली आहे.