नाशिक : महापालिकेचे दैनंदिन काम लिपिकाकडे त्याच्या सोयीसाठी जोडीला शिपायी, मात्र शिपायी काम करतो आणि लिपिक करतो आराम, तर १४ नस्ती काढणे बंधनकारक असताना दोन नस्तीही दिवसभरात निघत नाही... महापालिकेच्या पश्चिम विभागाच्या कार्यालयात आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिलेल्या भेटीत हा प्रकार आढळला असून, त्यासंदर्भात संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना तंबी दिली आहे. कामाचे फेरनियोजन करून संबंधित कर्मचाऱ्यांना घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीच्या कामांना जुंपण्याचे आदेशच आयुक्तांनी दिले आहेत.महापालिकेच्या विविध विभागांना भेटी देण्याचे सत्र आयुक्तराधाकृष्ण गमे यांनी केले असून, गुरुवारी (दि. १८) आयुक्तांनी पश्चिम विभागीय कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांच्या तपासणीत महापालिकेच्या गलथान कारभाराचे दर्शन घडले. एका विभागातील लिपिकाच्या जोडीला असलेला शिपाईच काम करत होतात, तर लिपिक आराम करीत होता. दुसरीकडे काही तपासणीत दररोज १४ संदर्भ नस्तींवर काम करणे आवश्यक असताना प्रत्यक्षात मात्र दोन नस्तीदेखील निघत नसल्याचे आढळले, विभागीय अधिकारी नितीन नेर यांच्यासह अन्य अधिकाºयांसमक्ष सर्वच विभागांची झाडाझडती घेताना हा प्रकार आढळला. काही ठिकाणी तर महापालिकेने विभागीय कार्यालयात एस बॅँकेच्या मदतीने सीएफसी सेंटरमध्येच जन्ममृत्यूचे दाखले घेण्याचे काम करणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात महापालिकेचे कर्मचारीदेखील हेच काम करीतअनेक कर्मचाºयांनी वर्कशीट म्हणजेच काय काम केले याचे कोणतेही रेकॉर्ड ठेवले नसून एका महिला कर्मचाºयाचे काम तपासले असता तिने १६ एप्रिल रोजी कोणत्याही प्रकारचे काम केले नसल्याचे आढळले आहेत याबाबतही आयुक्तांनी जाब विचारला. जे कर्मचारी या पद्धतीचे कामकाज करणार नाहीत त्यांचे वेतनच काढले जाणार नाही अशाप्रकारचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.
लिपिकाचे काम शिपायाकडे, फाइलींचा नाही निपटारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 12:29 AM