नाशिक : सब मर जायेंगे, सिर्फ नाशिक स्मार्टरोड का काम चालू रहेगा....सोयी रहो अनारकली! नासिक स्मार्टरोड अगले जनम में ही देखने मिलेगा...! स्मार्टरोडचे काम आणि दोन ते तीन वर्षे थांब, असा कारभार दिल्याने आता त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभ हा पथदर्शी स्मार्टरोड संतापाबरोबरच चेष्टेचा विषय ठरला आहे. अवघ्या एक किलोमीटरचा हा रस्ता दोन ते अडीच वर्षांपासून तयार करण्याचे काम सुरूच असून, ते पूर्ण होत नसल्याने आता त्याबाबत मिश्कीलपणे सोशल मीडियावर पोस्ट फिरत आहेत.नाशिकमध्ये अनेक रस्ते झालेत, काही काँक्रिटीकरण तर काही ट्रिमिक्स पद्धतीने झालेत, परंतु अवघ्या एक किलोमीटरचा रस्ता दोन ते अडीच वर्षांपासून पूर्ण होत नाही. रस्ता होणार होणार म्हणताना अनेक डेडलाइन गेल्या. परंतु रस्ता झाला नाही. गेल्यावर्षी नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाल्यानंतर १ एप्रिल पासून ठेकेदाराला ३६ हजार रुपयांचा रोज दंड केला जात आहे. परंतु त्यानंतरदेखील रस्ता पूर्ण झालेला नाही. ऐन सणासुदीत रस्ता बंद असल्याने दुकानदारांचे व्यवसाय चौपट झाले. पावसाळ्यात याच मार्गावरील शालेय विद्यार्थ्यांना मागील बाजूच्या स्टेडियमवरून चिखलात प्रवास करावा लागला, परंतु रस्ता झाला नाही. नागरिकांच्या सहनशक्तीचा अंत बघत सीबीएस आणि मेहेर चौक फोडण्यातआले. त्यामुळे व्यापाऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागले त्यानंतर आता अशोकस्तंभ चौक फोडण्यात आला आहे.या चौकाचे काम पूर्ण करून २६ जानेवारीस खºया अर्थाने या मार्गावर प्रजासत्ताक सुरू होईल, असे सांगितले गेले असले तरी या कामाची संथगती बघता हे काम वेळेत पूर्ण होईल काय याविषयी शंकाच निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे आता संतप्त दुकानदार आणि नागरिकांनी स्मार्ट सिटीची खिल्ली उडविणे सुरू केले आहे. आता यानंतरही स्मार्ट सिटी कंपनी किती गांभीर्याने हा प्रश्न सोडविते याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.स्मार्टरोड आणि अफलातून स्कीम...स्मार्टरोडचे काम रखडल्यानंतर दुकानदारांनी अभिनव पद्धतीने आपल्या संतप्त भावनांना वेगळी वाट करून दिली. सीबीएसवरील एका झेरॉक्स व्यावसायिकाने ‘आम्ही अक्षरश: स्मार्ट रस्त्यावर आलो’ असा फलक लावला तर अशोक स्तंभावरील एका ट्रॉफीविक्रेत्याने ‘स्मार्टरोडचे काम होईपर्यंत ट्रॉफी खरेदीवर सूट’ जाहीर केली आहे. परंतु तरीही रस्त्याचे काम पूर्ण होत नसल्याने नागरिकांच्या त्रस्तेत भर पडली आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी अपेक्षा परिसरातील व्यवसायिकांकडून व्यक्त केली जात आहे.कामाची दहा टक्के देयके थांबविलीनाशिककरांनी अत्याधुनिक पद्धतीचे सिमेंटचे रस्ते पाहिले नाही असे नाही. महापालिकेच्या पहिल्याच पंचवार्षिक कारकिर्दीत मंजूर झालेला महात्मा गांधी रस्ता ट्रिमिक्स पद्धतीने बनविण्यात आला. या रस्त्याचे काम काहीसे लांबले असले तरी गेल्या पंचवर्षात असा रस्ता झाला नाही. असाच प्रकार कॉलेजरोड संदर्भातदेखील झाला. कॅनडा कॉर्नर लोकमत सर्कलपर्यंतच्या या रस्त्याला जरा कोठे ओरखडा जाणवत नाही. मात्र स्मार्टरोडचे जे काही काम झाले आहे त्याच्याच मुळात गुणवत्तेविषयी शंका घेतल्या जात असून, या कामाचे दहा टक्के देयकेदेखील थांबवण्यात आले आहे.
स्मार्टरोड का काम अगले जनम में ही देखने मिलेगा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 11:22 PM
सब मर जायेंगे, सिर्फ नाशिक स्मार्टरोड का काम चालू रहेगा....सोयी रहो अनारकली! नासिक स्मार्टरोड अगले जनम में ही देखने मिलेगा...! स्मार्टरोडचे काम आणि दोन ते तीन वर्षे थांब, असा कारभार दिल्याने आता त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभ हा पथदर्शी स्मार्टरोड संतापाबरोबरच चेष्टेचा विषय ठरला आहे.
ठळक मुद्देआता चेष्टेचा विषय। तारीख पे तारीखमुळे नाशिककर वैतागले