सुरगाणा : एक कोटीच्या खर्चाचे काम संथगतीने सुरगाणा : येथील यात्रेच्या माळाजवळ क्रीडा संकुलाचे तब्ब्बल एक कोटी रुपये खर्चाचे काम रखडले असून, सदर काम त्वरित पूर्ण करून विविध प्रकारच्या खेळाडूंना सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी खेळाडू व क्रीडाप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना त्यांच्यातील खेळाचे सुप्त गुण विकसित होऊन विविध स्तरावर पार पडणाऱ्या स्पर्धांमध्ये त्यांच्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन व्हावे व खेळाडू तयार व्हावेत या उद्देशाने येथील यात्रेच्या माळाजवळ एक कोटी खर्च असलेल्या क्रीडा संकुलाचे काम नाशिक येथील वक्रतुंड कन्स्ट्रक्शन या कंपनीला मिळाले. या कामाची देखभाल करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आली. क्रीडा संकुलाच्या बांधकामाला २०११-१२ मध्ये मंजुरी मिळाली होती. त्यानंतर संरक्षक भिंत व इमारतीचे बांधकाम करण्यात आले; मात्र गेल्या दोन वर्षांपासून काम रखडल्याने क्रींडापे्रमींकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. क्रीडा संकुलाचे काम त्वरित पूर्ण करून खेळाडूंसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे. या क्रीडा संकुलाच्या इमारतीची व तेथे असलेल्या वस्तंूची देखभाल करण्यासाठी नेमणूक करण्यात आलेले महारू खांडवी यांना १४ महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याचे समजते. (वार्ताहर)
क्रीडा संकुलाचे काम रखडले
By admin | Published: December 10, 2015 11:04 PM