नाशिक : आदिवासी विकास भवन येथील अनुसुचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या कार्यालयातील उपसंचालक जागृती कुमरे यांच्या माजी आमदार संजय चव्हाण यांनी शासकिय कामात अडथळा आणून शिवीगाळ केल्याप्रकरणी बुधवारी (दि.६) कार्यालयातील अधिकारी-कर्मचा-यांनी काम बंद आंदोलन करुन निषेध नोंदविला.माहितीच्या अधिकारामध्ये मागविलेल्या माहितीची विचारणा करण्यासाठी आलेले बागलाण तालुक्यातील माजी आमदार तथा विद्यमान आमदार दिपिका चव्हाण यांचे पती संजय चव्हाण यांनी कार्यालयात हुज्जत घालत शिवीगाळ करुन धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप उपसंचालक कुमरे यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी चव्हाण यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यान्वये कारवाई करण्याची फिर्याद मुंबईनाका पोलीस ठाण्यात दिली आहे. दरम्यान, सर्व अधिकारी-कर्मचा-यांनी बुधवारी काम बंद आंदोलन करत शासकीय कर्मचाºयांच्या सुरक्षेचा चव्हाट्यावर आलेल्या प्रश्नाविषयी जोरदार आंदोलन करत घोषणाबाजी केली. आदिवासी विकास भवन कार्यालयाच्या परिसरात सुरक्षा वाढवून बाहेरील कुठल्याही राजकिय व्यक्तींचा वाढता हस्तक्षेप व अरेरावी थांबविण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या मागणीचे निवेदन आदिवासी विकास आयुक्तांना सादर करण्यात आले. सर्व अधिकारी-कर्मचा-यांनी काम बंद आंदोलन करुन ठिय्या दिला. यावेळी सर्व कर्मचा-यांनी काळ्या फिती लावून बुधवारी कार्यालयात हजेरी लावली. कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सकाळी साडेअकरा वाजेनंतर महिला-पुरूष अधिकारी-कर्मचा-यांनी ठिय्या देऊन चव्हाण यांच्या दादागिरीचा निषेध नोंदवून कठोर कारवाईची मागणी केली. दुपारी जेवणानंतर पुन्हा आंदोलन पुर्ववत करण्यात आले. एकूणच आदिवासी विकास भवनातील कामकाज या आंदोलनामुळे प्रभावीत होऊन पुर्णपणे ठप्प झाले होते.
माजी आमदाराच्या दादागिरीच्या निषेधार्थ नाशिक आदिवासी विकास भवनातील अधिकारी-कर्मचा-यांचे काम बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 3:42 PM
चव्हाण यांनी कार्यालयात हुज्जत घालत शिवीगाळ करुन धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप उपसंचालक कुमरे यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी चव्हाण यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यान्वये कारवाई करण्याची फिर्याद मुंबईनाका पोलीस ठाण्यात दिली आहे
ठळक मुद्देमाजी आमदार संजय चव्हाण यांनी शासकिय कामात अडथळा आणून शिवीगाळसर्व कर्मचा-यांनी काळ्या फिती लावून बुधवारी कार्यालयात हजेरी लावली.