संघटनेच्यावतीने वरिष्ठ पातळीवर १५ मे रोजी आपल्या मागण्यांसाठी बैठक आयोजित केली होती. सदर बैठकीत समाधानकारक निर्णय न झाल्याने संघटनेतर्फे बंदचा इशारा देण्यात आला होता. आज मालेगावी शहरात खासगी वीज पुरवठा कंपनी वगळता तालुक्यातील वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले. यात कोविड सेंटर व अत्यावश्यक ठिकाणांवर आंदोलनातून वगळले होते.
कर्मचाऱ्यांच्या मुख्य मागण्यांमध्ये मुख्यत्वे राज्य शासनाने फ्रंटवर काम करणाऱ्या वीज कामगार, अभियंते, अधिकारी, कंत्राटी कामगार यांना संघटना फ्रंटलाइन वर्कर्सचा दर्जा द्यावा, प्राधान्याने लसीकरण करावे, अशी मागणी केली होती. याकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने शेकडो वीज कर्मचारी मयत झाले तर अनेक कामगार व त्यांचे कुटुंबीय कोरोना बाधित झाले. याबाबत शासनाचे नकारात्मक धोरण असतानाही कोरोना व लाॅकडाऊन काळात जोखीम पत्करून वीज पुरवठा सुरळीत ठेवला. ही कामे करताना राज्यातील सुमारे ४०० हून अधिक कर्मचारी दगावले, असा आरोप संघटनांनी केला तर या काळात सतत कामे व वीज देयके वसुलीसाठी दबाव आणला गेला तर संघटनांच्यावतीने कामगारांसह इतरांना विमा योजना, वैद्यकीय सवलती, मयत व्यक्तीच्या वारसांना आर्थिक मदत आदी मागण्या करण्यात आल्या.
कामबंद आंदोलनात तालुक्यातील २२ उपकेंद्र सहभागी झाले. यात रावळगाव, दाभाडी, झोडगे, चंदनपुरी, वडनेर, दहीवाळसह वीज कर्मचारी संघटनेचे महाराष्ट्र स्टेट ईलेक्ट्रिकल वर्क फेडरेशन, वीज कामगार महासंघ, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन, म.रा.वीज तांत्रिक कामगार संघटनांचे मुख्य पदाधिकारी, सदस्य, कर्मचारी सहभागी झाले होते. तर कामबंद आंदोलन सुरू करूनदेखील शासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, त्यामुळे आता हे कामबंद आंदोलन बेमुदत करण्यात येणार असल्याने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.