शुक्रवारी सकाळी अकरा वाजता बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया मालेगाव सेंटरचे अध्यक्ष रवींद्र अहिरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व बांधकाम ठेकेदार संघटना व मजूर संघटनांच्या पदाधिकारी व सदस्यांनी तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली आणि निवेदन दिले. लॉकडाऊननंतर बांधकाम साहित्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने बांधकाम क्षेत्रावर विपरीत परिणाम झाला आहे. सिमेंट व स्टीलच्या दरात तब्बल ४० ते ५० टक्क्यांनी मनमानी पद्धतीने वाढ आहे. यामुळे सर्वसामान्यांना घर खरेदी करणे आता परवडत नाही. सरकारी कामे व इन्फ्रास्ट्रक्चरशी संबंधित कामांनाही या दरवाढीचा मोठा फटका बसत आहे. कोरोना महामारीमुळे अगोदरच बांधकाम व्यवसायात असंख्य अडचणी असताना दरवाढीमुळे क्षेत्राचे कंबरडेच मोडले आहे. शासनाने या कंपन्यांवर नियामक प्राधिकरण नियुक्त करून अन्यायकारक दरवाढ तत्काळ मागे घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
यावेळी बीएआय मालेगावचे अध्यक्ष रवींद्र अहिरे, राहुल भदाणे, राजेंद्र पवार, डी.एम. पाटील, अजय पाटील, संदीप बागुल, धनश्री ठाकरे, नितीन वाघ, शिवाजी रौंदळ, प्रशांत रौंदळ, दत्तू बैताडे, संजय वाघ, स्वप्नील वीरगावकर, मयूर पाटील, मंगेश खैरनार, दीपक सोनवणे, सुनील सोनवणे, विलास सूर्यवंशी, निलेश अमृतकार, दीपक आहिरे, संदीप कापडणीस, नाना मोरकर, रमेश भामरे, कुणाल सोनवणे, संदीप कापडणीस, सनी शर्मा, मनीष देवरे, अरुण भामरे, अमित बधान, वसंत मुंडावरे आदींसह बांधकाम व्यावसायिक उपस्थित होते.
===Photopath===
120221\12nsk_50_12022021_13.jpg
===Caption===
सटाणा शहर व बागलाण तालुक्यातील सर्व बांधकाम ठेकेदार संघटना व मजूर संघटनांतर्फे तहसिलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांना निवेदन देताना रवींद्र अहिरे, राहुल भदाणे, शिवाजी रौंदळ, प्रशांत रौंदळ, दत्तू बैताडे आदि.