जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी, आंबे दिंडोरी, शिवनई, वरवंडी, म्हसरुळ या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहतूक करण्यास अडचण येत होती. तसेच अपघातालाही सामोरे जावे लागत असल्याने खड्डे बुजविण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात केल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.जानोरी ते वरवंडी या राज्यमार्गावर मोठ्या प्रमाणात शेतकरीवर्ग आपल्या शेतातील शेतमाल नाशिक भाजीपाला मार्केटला घेऊन जातात. तसेच नाशिक विमानतळावरही मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. परंतु या रस्त्यावर यावर्षीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत होती. अनेकवेळा वाहनधारकांना अपघाताला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने जानोरी, आंबे दिंडोरी, वरवंडी व शिवनई या रस्त्याचे खड्डे दुरुस्त करावेत, अशी मागणी भाजपचे दिंडोरी तालुका सरचिटणीस योगेश तिडके, शरद घुमरे यांनी केली होती. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेऊन रस्त्याच्या डागडुजीला सुरुवात केल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.जानोरी ते म्हसरुळ हा राज्यमार्ग असून या रस्त्याने शेतकरीवर्ग मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. तसेच नाशिक विमानतळावरील प्रवासीही ये-जा करतात. परंतु जानोरी ते वरवंडी या रस्त्याची खड्ड्यांमुळे अतिशय दयनीय अवस्था झाली होती. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेऊन रस्त्याच्या डागडुजीला सुरुवात केली आहे.- योगेश तिडके, दिंडोरी.
जानोरी ते वरवंडी रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 11:08 PM
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी, आंबे दिंडोरी, शिवनई, वरवंडी, म्हसरुळ या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहतूक करण्यास अडचण येत होती. तसेच अपघातालाही सामोरे जावे लागत असल्याने खड्डे बुजविण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात केल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
ठळक मुद्देग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.