नाशिक : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व मतदान केंद्रांना उपग्रहाशी जोडण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांचे सात विविध अॅँगलमध्ये अक्षांश-रेखांशासह छायाचित्रे काढण्यात सुरूवात झाली आहे. येत्या पंधरा दिवसात सदरचे काम पुर्ण करण्यात येणार असून, त्यासाठी खासगी छायाचित्रकारांना कंत्राट देण्यात आले आहे.मतदानाच्या दिवशी मतपत्रिका पळविणे, मतदान प्रक्रीयेत गोंधळ निर्माण करणे, हाणामारीच्या घटना घडणे आदी कारणांवरून निवडणूक आयोगाने देशपातळीवर अनेक मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित केले आहेत. वर्षानुवर्षे अशा संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरीक्त पोलीस बंदोबस्तासह निवडणूक अधिकारी, कर्मचा-यांनाही विशेष खबरदारी घ्यावी लागते. या संवेदनशील मतदान केंद्रांवर थेट निवडणूक आयोगाचे अधिकारी दिल्लीत बसून लक्ष ठेवू शकतील अशी योजना आयोगाच्या विचाराधिन असल्यामुळे सर्वच मतदान केंद्रांचे अक्षांश-रेखांश गोळा करण्याच्या सुचना सर्वच जिल्हाधिकाºयांना देण्यात आल्या आहेत. जुलै ते आॅक्टोंबर या दरम्यान निवडणूक आयोगाने राबविलेल्या मतदार पुर्नरिक्षण मोहिमे दरम्यानच मतदार यादीचे काम करणा-या बीएलओंना मतदारांच्या घरभेटी दरम्यानच मतदान केंद्रांची माहिती गोळा करण्याच्या सुचना दिल्या होत्या. परंतु त्यावेळी उडालेल्या गोंधळामुळे सदरचे काम मागे पडले. देशपातळीवर लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याचे थाटत असल्यामुळे आता आयोगाने त्यादृष्टीने तयारीचा भाग म्हणून लवकरात लवकर सर्वच मतदान केंद्रांची माहिती संकलित करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यानुसार स्थानिक पातळीवर जिल्हाधिका-यांनी त्या त्या विधानसभा मतदार संघाच्या सहाय्यक निवडणूक अधिकाºयांना मतदान केंद्राचे छायाचित्रे काढण्याच्या सुचना दिल्या आहेत.प्रत्येक मतदान केंद्र उपग्रहाच्या माध्यमातून जोडण्यात येणार असल्याने त्यादृष्टीने मतदान केंद्रांचे सात विविध दिशेने छायाचित्रे काढण्यात येणार आहे. त्यात मतदान केंद्रांवर जाण्याचा मार्ग, दिशा, मतदान केंद्राला लागून असलेल्या वास्तु, वस्ती, रहिवास, मतदान केंद्रांच्या पाठीमागचा परिसर, मतदान केंद्रांला जोडणारे रस्ते आदी भागाचा त्यात समावेश आहे. या छायाचित्रांच्या माध्यमातून निवडणूक आयोग त्यावर लक्ष ठेवण्याबरोबरच वर्षानुवर्षे संवेदनशील ठरणाºया मतदान केंद्रांचा आढावा घेण्यास मदत होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील ४४२८ मतदान केंद्रांवर खासगी छायाचित्रकारांच्या माध्यमातून छायाचित्र काढण्यास सुरूवात झाली आहे.
मतदान केंद्रांचे सात विविध अॅँगलमध्ये छायाचित्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 2:42 PM
मतदानाच्या दिवशी मतपत्रिका पळविणे, मतदान प्रक्रीयेत गोंधळ निर्माण करणे, हाणामारीच्या घटना घडणे आदी कारणांवरून निवडणूक आयोगाने देशपातळीवर अनेक मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित केले आहेत. वर्षानुवर्षे अशा संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरीक्त पोलीस बंदोबस्तासह
ठळक मुद्देनिवडणूक तयारी : संवेदनशील केंद्रांचा आढावा येत्या पंधरा दिवसात सदरचे काम पुर्ण करण्यात येणार