नाशिक : दुकानात काम करणाऱ्या कामगाराने दुकानदार आर्थिक अडचणीत असल्याने कर्ज काढून दुकानदाराला दिलेल्या रक्कमेची परतफेड न झाल्याने व दुकानदाराने हात उसनवार म्हणून घेतलेले पैसे परत न करता कामगाराला शिविगाळ करून तुजे कर्ज तुलाच फेडावे लागेल असे वेळोवेळी सांगून मानसिक त्रास दिल्याने कामगाराने राहते घरात विषारी औषध सेवन करून अत्महत्या केल्याची घटना भद्रकाली परिसरात घडली असून भद्रकाली पोलीस ठाण्यात तीन संशयितांविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी जुने नाशकातील चव्हाटा परिसरातील ऋषिकेश राजेंद्र सोनवणे (२०) याने भद्रकाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्याचे काका मयत जयेश किर्तीलाला लोखंडे (२८)हे आठवर्षापासून कॅनडा कॉर्नर परिसरातील संशयित आरोपी राहूल इसराणी, कमलेश इसराणी व प्रविण बेन्स यांच्या दुकानात कामाला होते. यातील राहूल व कमलेश यांना पैशाची गरज असल्याने मयत जयेश लोखंडे यान स्वत:च्या नावावर १ लाख ४४ हजार ७९८ रुपयांचे कर्ज काढून संपूर्ण रक्कम राहूल व कमलेश यांना दिली. यावेळी कर्जाची परतफेडही आम्हीच करून असे राहूल आणि कमलेश यांनी लोखंडेला सांगितले होते. परंतु, पैसे मिळाल्यानंतर त्यांनी कर्जाची परतफेड केली नाही. त्याचप्रमाणे राहूल अणि कमलेशला अन्य लोकांकडून हातउसनवार घेऊन दिलेले पैसेही त्यांनी परत केले नाही. या पैशांची मागणी केली असता राहूल व कमलेश यांचा दाजी संशयित आरोपी प्रविन बेन्स याने मयत जयेश लोखंडे यांस शिवीराळ करून तुजे कर्ज तुलाच भरावे लागेल असे वेळोवेळी सांगून मानसिक त्रास दिला. त्यामुळे जयेश लोखंडे यास कर्जाची परतफेड व इतर लोकांचे उसनवार घेतलेले पैसे परत करता न आल्याने मानसिक त्रास झाल्याने संशयितांच्या त्रासाला कंटाळून मंगळवारी (दि.२१) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास चव्हाटा परिसरातील चर्मकार लेन येथील राहते घरात विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याचा प्रकार घडला. त्यामुळे त्यांना आत्महत्या करण्यास आरोपींनी प्रवृत्त के ल्याचा आरोप करी ऋषिकेश सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भद्रकाली पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशकात दुकानदाराच्या त्रासाला कंटाळून कामगाराची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 4:26 PM
दुकानदार आर्थिक अडचणीत असल्याने कर्ज काढून दुकानदाराला दिलेल्या रक्कमेची परतफेड न झाल्याने व दुकानदाराने हात उसनवार म्हणून घेतलेले पैसे परत न करता कामगाराला शिविगाळ करून तुजे कर्ज तुलाच फेडावे लागेल असे वेळोवेळी सांगून मानसिक त्रास दिल्याने कामगाराने अत्महत्या केल्याची घटना भद्रकाली परिसरात घडली असून भद्रकाली पोलीस ठाण्यात तीन संशयितांविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठळक मुद्देदुकानदारांच्या त्रासामुळे कामगाराची आत्महत्यादुकानदारांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा