शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

पहाटेच्या गारव्याचा शेतकऱ्यांसह मजुरांनाही फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2019 1:30 AM

संजय दुनबळे। नाशिक : गेल्या दोन-तीन दिवसांपासून थंडीचा कडाका कमी झाला असला तरी अद्यापही सकाळी असलेल्या गारव्याचा द्राक्षबागांमध्ये काम करणाºया मजुरांना पर्यायाने शेतकºयांनाही फटका बसत आहे. गारव्यामुळे मजुरांच्या कामाचे तास कमी झाले असून, सकाळी ७ वाजता कामाला येणारे मजूर सध्या ११ वा. येऊन दुपारी ३ वाजता सुटी करून घेत आहेत. मजुरीचे दर मात्र तेच आहेत. कामाचे तास कमी झाल्याने कामाचा उरकही कमी आहे त्यांचा फटका द्राक्ष बागायतदारांना बसत आहे.

ठळक मुद्देआर्थिक नुकसान : कामाचे तास झाले कमी; उरक कमी, औषधांमुळे हातांवर परिणाम

 

 

संजय दुनबळे।नाशिक : गेल्या दोन-तीन दिवसांपासून थंडीचा कडाका कमी झाला असला तरी अद्यापही सकाळी असलेल्या गारव्याचा द्राक्षबागांमध्ये काम करणाºया मजुरांना पर्यायाने शेतकºयांनाही फटका बसत आहे. गारव्यामुळे मजुरांच्या कामाचे तास कमी झाले असून, सकाळी ७ वाजता कामाला येणारे मजूर सध्या ११ वा. येऊन दुपारी ३ वाजता सुटी करून घेत आहेत. मजुरीचे दर मात्र तेच आहेत. कामाचे तास कमी झाल्याने कामाचा उरकही कमी आहे त्यांचा फटका द्राक्ष बागायतदारांना बसत आहे.निफाड व दिंडोरी तालुक्यातील काही द्राक्षबागांमध्ये थिनिंग, डिपिंगची कामे सुरू आहेत. या कामांसाठी आदिवासी भागातील मजूर मोठ्या प्रमाणावर येत असतात. मजूर सकाळी लवकर येऊन थिनिंग, डिपिंग अशी कामे करतात. डिपिंग करताना द्राक्षाचा प्रत्येक घड औषधात बुडवावा लागतो. थंडीच्या दिवसातील या कामात औषधांमुळे मजुरांचे हात वातडून जातात. मागील आठवड्यात निफाड तालुक्यात थंडीचा कडाका अधिक असल्याने कडाक्याच्या थंडीत काम करणे जिकिरीचे झाल्याने अनेक मजुरांनी ऊन पडल्यानंतरच कामावर येणे पसंत केले आहे.बागेत काम सुरू असतानाच दुपारी ३ वाजेनंतर पुन्हा थंडीचा जोर वाढत असल्यामुळे मजूर काम आटोपते घेत आहे. यामुळे कामाचे दिवस वाढले गेल्याने त्याचा द्राक्ष उत्पादकांना काहीअंशी फटका बसला आहे.सध्या बहुतांश ठिकाणी ही कामे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनेच दिली जात असल्याने कामाचे तास कमी की अधिक याचा विचार केला जात नसला तरी वेळेत काम उरकले जात नसल्याचा अनुभव शेतकºयांना येत आहे. थंडीच्या दिवसात अनेकवेळा सकाळच्या वेळी द्राक्षमण्यांवर दवबिंदू पडलेले असतात.थिनिंग, डिपिंग करताना दवबिंदू सुकणे आवश्यक असते. त्यामुळे अनेकवेळा शेतकरीही मजुरांना कामावर लवकर बोलवत नसल्याचे निफाड तालुक्यातील वनसगाव परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकºयांनी सांगितले. घडामधील द्राक्षमण्यांची संख्या होते निश्चितद्राक्षांची योग्य वाढ होण्यासाठी तीनवेळा थिनिंग केली जाते. थिनिंगमध्ये द्राक्षघडातील बारीक मणी काढून टाकले जातात. थिनिंगनंतर एका द्राक्षघडात साधारणत: ९० ते १०० मणी ठेवले जातात. काही बागायतदार ही संख्या १२०पर्यंत ठेवतात. थिनिंगनंतर द्राक्षमण्यांची योग्य फुगवण होण्यासाठी प्रत्येक घड औषधात बुडवला जातो. त्याला डिपिंग असे म्हणतात. निर्यातक्षम द्राक्ष तयार करण्यासाठी शेतकºयांना ही काळजी घ्यावीच लागते. थंडीमुळे या कामांचा कालावधी वाढल्याने शेतकºयांचे आणि मजुरांचेही नुकसान होत आहे. या कामासाठी आठ ते दहा मजुरांची टोळी एकरी ४५०० रुपयांचा दर घेते. दोन-तीन दिवसात काम आटोपले तर ते त्यांना परवडते. मात्र कालावधी वाढला तर त्यांना ते परवडेनासे होते, अशी माहिती द्राक्ष उत्पादक शेतकरी राहुल डुंबरे यांनी दिली.यावर्षी निफाड तालुक्यात थंडीची मोठ्या प्रमाणात लाट आली होती. यापूर्वी सन १९६२ आणि १९७० मध्ये अशा प्रकारची थंडीची लाट आली होती. त्यावेळी ऊस, द्राक्षबागा जळाल्या होत्या. इतकेच नव्हे तर बादलीतील पाण्याचा बर्फ झाला होता. त्यानंतर सन २०१४ मध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाली होती, अशी आठवण सारोळे खुर्द येथील वयोवृद्ध शेतकरी एकनाथ जेऊघाले यांनी सांगितली.