त्र्यंबकेश्वर : गेल्या काही दिवसांपासून उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील चार तालुक्यांतील तहसील कार्यालयांसमोर श्रमजीवी संघटनेने हक्काग्रह आंदोलन सुरू केले होते. शासनाकडुन यासंदर्भात काहीच कारवाई होत नसल्याने सोमवार (दि.१) पासून संघटनेने रस्त्यावर उतरुन पेगलवाडी फाटा येथे आंदोलन केले. पाच लोक बेमुदत अन्नत्याग सत्याग्रहाला बसले आहेत.महाराष्ट्र शासनाने उच्च न्यायालयात दिलेल्या हमी पत्रानुसार जो पर्यंत कार्यवाही होउ शकत नाही. तोपर्यंत श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते दररोज तहसील कार्यालयासमोर आपल्या हक्कासाठी बसणार आहेत असे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात श्रमजीवी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विवेक पंडित यांनी म्हटले आहे. त्र्यंबकेश्वरसह इगतपुरी, सुरगाणा व पेठ तहसील कार्यालयासमोर सरकारने उच्च न्यायालयात दिलेल्या हमीपत्राचे पालन करावे यासाठी श्रमजीवी संघटनेचा हा हक्काग्रह आहे.श्रमजीवी संघटनेचेसंस्थापक विवेक पंडित यांनी या काळात वंचित गरिबांना रेशनकार्ड आणि धान्यासोबतच इतर जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात म्हणून उच्च न्यायालयात जनहित याचिकादाखल केलेली आहे. यावरील सुनावणीत राज्य शासनाने हमीपत्र देत पंडित यांनी केलेल्या मागण्या मान्य केल्या आहेत.मात्र त्या हमीपत्राची अंमलबजावणी झालीच नाही, अखेर श्रमजीवी संघटनेने अनोखा पवित्रा घेतला आहे. आतापर्यंत आंदोलन, मोर्चा, सत्याग्रह केलाजात होता. आता श्रमजीवी रेशन हक्कासाठी प्रत्येक तहसील कार्यालयासमोर ‘हक्काग्रह’ करत आहे.-------------------------------फिजिकल डिस्टन्सिंगचे पालनकोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टिन्संगचे पालन करु न हा हक्काग्रह होत आहे. या आंदोलनात सहभागी बांधव हे शिदोरी बांधून आणत आहे व आंदोलनस्थळी जेवण करत आहेत. सायंकाळी तहसीलदारांना निवेदन देऊन आंदोलक घरी जातात. कोरोना रोखण्यात व्यस्त असलेल्या शासनाकडून आता काय भूमिका घेतली जाते, याकडे आंदोलकांचे लक्ष लागून आहे.
श्रमजीवी उतरले रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2020 9:58 PM