नाशिक : राज्यातील सध्याची दुष्काळी स्थिती लक्षात घेता महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत एका ग्रामपंचायत हद्दीत एकाच वेळेस पाच विहिरींची कामे सुरू करण्याचे आदेश राज्याच्या नियोजन विभाग (रोहयो) सचिव एकनाथ डवले यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.राज्यात दुष्काळी स्थितीमुळे रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामे हाती घेण्यात आलेली आहेत. याशिवाय, रोहयोंतर्गत सिंचनाच्या सुविधा निर्माण करण्यालाही प्राधान्य दिले जात आहे. दुष्काळी स्थितीमुळे राज्यात अपूर्ण असलेल्या विहिरींची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. याशिवाय, एका ग्रामपंचायत हद्दीत एकाच वेळी ५ विहिरींची कामे हाती घेण्याचे आदेशित करण्यात आले आहे. मात्र, याबाबत नियोजन करताना सध्या प्रगतीपथावर सुरू असलेल्या विहीरी विचारात घेऊन नवीन विहीरी मंजूर करण्याचे सूचित केले आहे. एका ग्रामपंचायतीत ३ विहीरींची कामे प्रगतीपथावर असल्यास त्या ग्रामपंचायत हद्दीत नव्याने दोन सिंचन विहिरींची कामे हाती घेण्याचे प्रस्तावित केले आहे. महात्मा गांधी राष्टय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीला पाच विहिरींची कामे सुरू करण्याचे आदेशित केल्याने त्या-त्या गावातील सिंचनाचा प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे.अपूर्ण विहिरींना प्राधान्यग्रामपंचायत हद्दीत अपूर्ण राहिलेल्या विहिरींची कामे आधी प्राधान्याने हाती घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र, ज्या ग्रामपंचायत हद्दीत पाच पेक्षा जास्त विहिरी अपुर्ण असतील त्याठिकाणी नवीन विहिरींना प्रशासकीय मान्यता देण्यात येऊ नये, अशा सूचनाही वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
प्रत्येक ग्रामपंचायतीत पाच विहिरींची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2019 4:30 PM
रोहयो : अपुर्ण विहिरींची कामे पूर्णत्वाचे आदेश
ठळक मुद्देराज्यात दुष्काळी स्थितीमुळे रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामे हाती घेण्यात आलेली आहेत.