चांदवड - चांदवड येथील एस.एन.जे.बी. संचलित स्व.सौ. कांताबार्ई भवरलाल जैन अभियांत्रिकी महविद्यालयातील एमबीएविभाग व ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने जे-गेट :ई रिसोर्सचा वापर कसा करावा व जे-गेट ई रिसोर्सचे महत्व या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यशाळा ही सर्व विद्यार्थी -विद्यार्थीनी व प्राध्यापकांसाठी घेण्यात आली.यासाठी तज्ञ म्हणून जे गेटचे मयंक देडीया यांनी मार्गदर्शन केले.त्यात त्यांनी जे-गेट या ई रिसोर्सविषयी माहिती दिली. तर एस.एन.जे.बी. अभियांत्रिकी महाविद्यालयाने जे -गेट चे सभासदत्व घेतले आहे. जे -गेट या ई - रिसोर्समध्ये ई जर्नल्स , संशोधन लेख, पीएचडी प्रबंध असे उपयुक्त वाचन साहित्य डिजीटल स्वरुपात उपलब्ध आहेत.या वाचन साहित्याची परिपुर्ण माहिती देऊन त्याचा विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे वापर करावा याबाबतची माहिती देऊन मयंक दडिया यांनी शंकाचे निरसन केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एम.डी. कोकाटे होते. तर एम.बी.ए.विभागप्रमुख डॉ. ए.आर. बोरा, ग्रंथपाल डॉ. एम.बी.केदार यांनी मार्गदर्शन केले. प्रा. लिना लासी यांनी संयोजन केले.
चांदवड अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 5:57 PM