देवळा : येथील कर्म. रामरावजी आहेर महाविद्यालयात ‘नवज्ञान निर्मितीत इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर’ या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. प्राचार्य हितेंद्र आहेर अध्यक्षस्थानी होते. समन्वयक जयवंत भदाणे यांनी प्रास्ताविक व कार्यशाळेची भूमिका मांडली. विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. एम. आर. बच्छाव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने परिषदेचे उद्घाटन झाले.पहिले पुष्प गुंफताना एकनाथ पगार यांनी सांगितले की, केवळ मनोरंजनासाठी माध्यमे नाहीत तर मानवी जीवनाचे मंगलमय पसायदान मिळण्यासाठी इलेक्ट्रॉनिक साधनांचा आणि माध्यमांचा वापर जबाबदारीने केला पाहिजे.शुद्ध-अशुद्ध लेखन, लेखनाचे नियम त्यांनी सांगितले. तर आधुनिक तंत्रसाधने ही मूल्यांची जोपासना करण्यासाठी वापरावीत, असे विचार पगार यांनी मांडले.दुसऱ्या व्याख्यानात इंजि. प्रवीण संचेती यांनी कामाच्या ठिकाणीही नवीन स्किल शिकून कार्यक्षमता वाढविल्यामुळे शिक्षण सोईच्या ठिकाणी व सोईच्या वेळेस घेता येते. याबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले.कार्यशाळेसाठी उपप्राचार्य डॉ. एम. एच. आहेर, डॉ. सुनील भामरे, डॉ. विलास वाहुळे, डॉ. सुरवशे यांच्यासह जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. प्रा. राकेश घोडे यांनी आभार मानले.
देवळा महाविद्यालयात कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 6:40 PM
कर्म. रामरावजी आहेर महाविद्यालयात ‘नवज्ञान निर्मितीत इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर’ या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
ठळक मुद्दे‘नवज्ञान निर्मितीत इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर’वर चर्चा