नाशिक : पर्यावरणाच्या संरक्षणासाठी अनेक शाळांमध्ये शाडूमातीच्या गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.पेठे विद्यालयात शाडूमातीपासून गणपती बनविण्याची कार्यशाळा झाली. रूपाली रोटवदकर यांनी विद्यार्थ्यांना मूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण दिले.मेरी शाळानाशिक एज्युकेशन सोसायटीच्या सी.डी.ओ. मेरी हायस्कूल येथे संस्थेचे अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी नगरसेवक यांच्या सहकार्याने शाळेतील २८५ विद्यार्थ्यांनी शाडूमातीच्या आकर्षक गणेशमूर्ती तयार करून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला चांगला प्रतिसाद दिला.पंचवटी प्रभागाचे सभापती रु ची कुंभारकर यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. कला शिक्षक मनीषा मोरे, अभिलाषा घुगे आणि नामदेव मधे यांनी सर्वांना दिवसभर मार्गदर्शन करून मनमोहक गणेशमूर्ती तयार करून घेतल्या आणि नवनर्मितीचा विश्वास दिला. यावेळी शाळा समिती अध्यक्ष चंद्रशेखर वाड, मुख्याध्यापक पूजा गायकवाड, माजी नगरसेवक अरुण पवार, शालिनी पवार, रंजना भानसी, संस्था सहकार्यवाह तथा शिक्षक प्रतिनिधी दिलीप अहिरे, श्याम पिंपरकर, पालक संघ कार्यध्यक्ष किरण काकड, उपमुख्याध्यापक राजश्री वैशंपायन, पर्यवेक्षक कृष्णा राऊत, मधुकर पगारे यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यशाळेसाठी शाडूमाती माजी नगरसेवक अरुण पवार यांनी दिली होती.यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना दिलीप अहिरे यांनी सर्वांनी पर्यावरण वाचविण्याची आणि पर्यावरणपूरक, इको फ्रेंडली बाप्पा बसविण्याची शपथ दिली. स्वागत प्रास्ताविक वैशंपायन यांनी केले, तर कृष्णा राऊत यांनी आभार मानले.शिवाजी विद्यालयशिंदे येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात शाडूमातीपासून गणपती बनविणे कार्यशाळा उत्साहात पार पडली. यावेळी मूर्तीकार जयदीप जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शाडूमातीपासून गणेशमूर्ती कशा बनवायच्या याचे प्रात्यक्षिक करून दाखवत विद्यार्थ्यांकडून गणेशमूर्ती बनवून घेतल्या. या कार्यशाळेत २०० विद्यार्थी सहभागी झाले होते. मुख्याध्यापक बी. एम. जाधव यांनी शाडूमातीचे गणपती पर्यावरणपूरक कसे असतात, पाणी दूषित होत नाही, नद्यांचे नैसर्गिक जलस्त्रोत व पाण्यात राहणारे जीवजंतू यांना कुठलीही हानी पोहचत नाही याबद्दल सविस्तर माहिती सांगितली. कार्यशाळेचे आयोजन कलाशिक्षक एस. एस. पटेल एस. एस. जाट यांनी केले होते. यावेळी विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.
पर्यावरणाच्या संरक्षणासाठी कार्यशाळा
By admin | Published: September 02, 2016 12:52 AM