सिन्नर : अन्नप्रक्रिया उद्योग करण्यासाठी व्यवस्थापन महत्त्वाचे असून, त्यासाठी संदर्भीय व्यवसायाचे मूलभूत ज्ञान आवश्यक असते. छोट्या स्वरूपातही उद्योग सुरू करून फायदा मिळवता येईल, असे प्रतिपादन अन्नप्रक्रिया उद्योगातील तज्ज्ञ प्रदीप संत यांनी केले. सिन्नर महाविद्यालयात झालेल्या ‘अन्नप्रक्रिया उद्योगातील संधी’ या कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यशाळेच्या अध्यक्षपदी प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ, उद्घाटक म्हणून उपप्राचार्य आर. व्ही. पवार, मार्गदर्शक म्हणून शुभदा पटवर्धन, समन्वयक डॉ. मनोहर झटे, संयोजिका प्रा. प्रणाली आहेर, डॉ. मोनाली वाकचौरे उपस्थित होते. अन्नप्रक्रिया व संवर्धन विभागामार्फत ‘अन्नपक्रिया उद्योगातील संधी’ यावर कार्यशाळा पार पडली. अन्नप्रक्रिया उद्योगात अनेक संधी उपलब्ध आहेत. अन्नप्रक्रिया हा दैनिक जीवनातील आवश्यक घटक असल्याचे संत यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता सुरवाडे, सायली ढोरे व राजश्री गाडेकर यांनी केले. संयोजिका प्रा. प्रणाली आहेर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अश्विनी वारु ंगसे, डॉ एन. के. जाधव, बी. यु. पवार, डॉ. राजेंद्र आगवणे यांनी प्रयत्न केले.
सिन्नर महाविद्यालयात अन्नप्रक्रिया उद्योगातील कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 4:14 AM