मालेगाव : महात्मा गांधी विद्यामंदिर, नाशिक संचलित मालेगाव कॅम्पातील एल. व्ही. एच. विद्यालयात अटल टिंकरींग लॅबची कार्यशाळा झाली. अश्विन रघुवंशी, दीपक आचालखांब, मुकेश देवांगन यांनी यावेळी मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी प्रास्तविक पर्यवेक्षक एम. पी. शिंदे यांनी केले. प्रशिक्षकांचे स्वागत व सत्कार मुख्याध्यापक दिनेश पवार यांच्या हस्ते करण्यात आला. सातवी ते दहावीच्या ३० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. डॉ. जयेशचंद्र पै यांनी कार्यशाळेला भेट दिली. पहिल्या दिवशी अटल टिंकरींग लॅबची ओळख, साहित्याची ओळख तसेच विद्यार्थ्यांना प्रोजेक्टचे विषय देण्यात आले. थ्रीडी प्रिंटरच्या सहाय्याने छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिकृती तयार करण्यात आली. ड्रोनविषयी माहिती देऊन प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. अटल टिंकरींग लॅबचे प्रमुख आर. एच. खान व सहाय्यक पी. के. ठाकूर, पी. एफ. महाजन यांनीही मार्गदर्शन केले.
मालेगाव एलव्हीएच विद्यालयात कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2021 4:15 AM