नाशिक : दहावी व बारावीची परीक्षाप्रक्रिया पार पडल्यानंतर आता शिक्षण विभागाने गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही अकरावी प्रवेशप्रक्रियेची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी रावसाहेब थोरात सभागृहात बुधवारी (दि.३) दुपारी १२ वाजता अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशासंबंधी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. शैक्षणिक वर्ष २०१८-१९ साठी अकरावीची प्रवेशप्रक्रिया गेल्या वर्षाप्रमाणेच आॅनलाइन पद्धतीने राबविली जाणार आहे. नाशिक शहरातील महानगरपालिका क्षेत्र व देवळाली कटक मंडळ क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी कला, वाणिज्य, विज्ञान व राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न एचएससी व्होकेशनल वर्गांसाठी आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे. या प्रवेशप्रक्रियेची माहिती विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना मिळावी यासाठी शाळांनी व महाविद्यालयांनी दर्शनी भागात प्रवेशप्रक्रियेची माहिती सूचना फलकावर प्रदर्शित करण्याच्या सूचना शिक्षण विभागातर्फे करण्यात आल्या असून, बुधवारी होणाऱ्या कार्यशाळेसाठी सर्व केंद्रप्रमुखांनी उपस्थित राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
अकरावी आॅनलाइन प्रवेशासाठी आज कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 1:03 AM
नाशिक : दहावी व बारावीची परीक्षाप्रक्रिया पार पडल्यानंतर आता शिक्षण विभागाने गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही अकरावी प्रवेशप्रक्रियेची तयारी सुरू केली आहे.
ठळक मुद्देप्रवेशप्रक्रिया गेल्या वर्षाप्रमाणेच आॅनलाइन पद्धतीनेमाहिती सूचना फलकावर प्रदर्शित करण्याच्या सूचना